वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज✍️
सोशल मीडिया संपादक मोहन दीपके
नवी दिल्ली : राष्ट्रीय राजधानी दिल्लीत काल (सोमवार) सायंकाळी मोठी दुर्घटना घडली. लाल किल्ल्याजवळ सायंकाळी ६.५२ वाजता झालेल्या भीषण स्फोटात दहा जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. स्फोटानंतर लागलेली आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या सात गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या.
हा स्फोट अत्यंत तीव्र स्वरूपाचा होता. त्यामुळे यामागे घातपात असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लाल किल्ल्यापासून अंदाजे अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक १ जवळ उभ्या असलेल्या एका इको कारमध्ये हा स्फोट झाला. स्फोटाचा धक्का इतका जबरदस्त होता की आजूबाजूच्या ८ ते १० वाहनांना आग लागून ती पूर्णतः जळून खाक झाली.
घटनास्थळी राष्ट्रीय तपास यंत्रणेचे (NIA) अधिकारी आणि फॉरेन्सिक तज्ज्ञांचे पथक दाखल झाले असून ते तपासकार्य सुरू आहे.
दिल्लीसह मुंबईत ‘हाय अलर्ट’
या धक्कादायक घटनेनंतर दिल्लीबरोबरच मुंबईतही ‘हाय अलर्ट’ जाहीर करण्यात आला आहे. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून मृतांची संख्या वाढण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे.


Post a Comment
0 Comments