वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज✍️
ठाणे जिल्हा मनोहर गायकवाड
मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आज वरळी डोम, मुंबई येथे पक्षाची जिल्हानिहाय आढावा बैठक पार पडली.
या बैठकीत पुणे जिल्हा (शहर व ग्रामीण) तसेच पिंपरी-चिंचवड शहरातील पक्षाची संघटनात्मक स्थिती, स्थानिक राजकीय परिस्थिती आणि आगामी राजकीय घडामोडींचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने पक्षाची विद्यमान ताकद, स्थानिक राजकीय समीकरणे, संघटनात्मक बांधणी, आव्हाने आणि पुढील रणनीती यावर सखोल चर्चा झाली. उपस्थित पदाधिकारी व लोकप्रतिनिधींनी आपल्या भागातील अहवाल सादर करत विविध सूचना, निरीक्षणे आणि मते मांडली.
सादर झालेल्या मुद्द्यांवर गांभीर्याने विचारविनिमय करत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी पक्ष संघटना अधिक सक्षम करण्यासाठी तातडीने अंमलात आणता येतील अशा ठोस उपाययोजनांची दिशा दिली. त्यांनी कार्यकर्त्यांना एकजुटीने काम करत पक्षाची ताकद वाढविण्याचे आणि आगामी निवडणुकांमध्ये अधिकाधिक यश मिळविण्यासाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले.
या बैठकीस पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी गृहमंत्री मा. आ. श्री. दिलीप वळसे-पाटील, राज्याचे कृषिमंत्री मा. श्री. दत्तात्रय भरणे, पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा व राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा सौ. रुपालीताई चाकणकर, आमदार मा. श्री. संजय बनसोडे तसेच विविध विभागीय सेलचे प्रमुख पदाधिकारी, संघटन पदाधिकारी आणि पक्षाचे वरिष्ठ नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



Post a Comment
0 Comments