वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज ✍️
कार्यकारी संपादक रितेश साबळे
छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) दिनांक 1 डिसेंबर 2025 : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६ डिसेंबर या 'महापरिनिर्वाण दिना'चे पावित्र्य आणि गांभीर्य राखण्यासाठी, त्या दिवशी महाराष्ट्र राज्यात कोणत्याही प्रकारचे सांस्कृतिक, मनोरंजक किंवा समारंभात्मक कार्यक्रम न घेण्यासंबंधी त्वरित शासन परिपत्रक काढावे, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्र पक्षाने राज्याचे मा.मुख्यमंत्री यांच्याकडे छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हाधिकारी मार्फत केली आहे.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, ६ डिसेंबर हा दिवस संपूर्ण देशात अत्यंत आदराने आणि शोकाकुल वातावरणात पाळला जातो. या दिवशी लाखो अनुयायी आणि नागरिक मुंबईतील चैत्यभूमीसह देशभरात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली अर्पण करण्यासाठी एकत्र येतात.
रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्रचे जिल्हा प्रमुख दिनेश गवळे यांनी सांगितले की, "हा दिवस केवळ एका महामानवाला श्रद्धांजली वाहण्याचा नसून, त्यांच्या महान कार्याचे आणि विचारांचे गंभीरपणे स्मरण करण्याचा दिवस आहे. या ऐतिहासिक दिवसाचे पावित्र्य भंग होऊ नये, ही आमची प्रामाणिक भावना आहे."
या निवेदनातील प्रमुख मागणी:
६ डिसेंबर, महापरिनिर्वाण दिनाच्या दिवशी महाराष्ट्र राज्यातील शासकीय, निमशासकीय, शाळा, महाविद्यालये तसेच खाजगी स्तरावर आयोजित होणारे सर्व प्रकारचे सांस्कृतिक, मनोरंजक कार्यक्रम संपूर्णपणे स्थगित/रद्द करण्यात यावेत. हा दिवस केवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मरण आणि आदरांजली वाहण्यासाठीच समर्पित असावा.
असे पक्षाच्या शिष्टमंडळ यांनी निवेदनाद्वारे मांडले आहे यावेळी मराठवाडा उपाध्यक्ष सुनील खरात, जिल्हा उपाध्यक्ष अरशाद लखपती, शहर अध्यक्ष रणजीत मनोरे, जेष्ठ नेते प्रकाश घोरपडे, जिल्हा महासचिव राजकुमार अमोलिक, जिल्हा संघटक भीमराव गाडेकर, हन्नु नाना, कडुबा म्हस्के,बादशाहा लखपती आदी उपस्थित होते.


Post a Comment
0 Comments