वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज ✍️
प्रतिनिधी दिनेश घनघाव:
शहापूर-दिनांक ३० नोव्हेंबर रोजी काजळविहीर येथे संविधान दिन तसेच ‘आम्ही भारतीय लोक’ संघटनेच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले, सावित्रीमाई फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून झाली. त्यानंतर संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन जनार्दन निचिते यांनी प्रभावीपणे केले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात भरत निचिते यांनी संघटनेच्या स्थापनेची पार्श्वभूमी, उद्दिष्टे आणि वर्षभर राबविण्यात आलेल्या उपक्रमांचा संक्षिप्त आढावा मांडला. प्रमुख वक्ते राजेश मोगरे यांच्या अभ्यासपूर्ण आणि प्रभावी व्याख्यानाने सभेला बौद्धिक उंची प्राप्त झाली. स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि सामाजिक न्याय या संविधानातील मूलभूत तत्त्वांची त्यांनी अतिशय सुलभ, परंतु सूत्रबद्ध अशी मांडणी केली. उद्देशिकेतील प्रत्येक शब्दामागील अर्थ त्यांनी तर्कशुद्ध उदाहरणांसह पटवून दिला.
अध्यक्षीय भाषणात डॉ. संजय निचिते यांनी संविधानामुळे भारत एकसंघ राष्ट्र म्हणून उभा राहिल्याचे अधोरेखित केले. स्वातंत्र्यापूर्वी मनुस्मृतीच्या आधारे चालणाऱ्या व्यवस्थेचा उल्लेख करून, भारतीय संविधानाने सर्व नागरिकांना समानता, स्वातंत्र्य आणि न्यायाची हमी दिल्याचे त्यांनी नमूद केले. विशेषत: मागास घटकांच्या उन्नतीसाठी करण्यात आलेल्या आरक्षणाच्या तरतुदीचे महत्त्व त्यांनी प्रभावीपणे स्पष्ट केले.
यावेळी गावातील नागरिकांनीही आपली मनोगते व्यक्त केली. श्किसन निचिते यांनी संविधानाचे दैनंदिन जीवनातील महत्त्व अधोरेखित केले, तर धीरज निचिते यांनी समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी संविधान साक्षरता अत्यावश्यक असल्याचे मांडले.
कार्यक्रमाला गावातील अनेक मान्यवरांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली. मालू गणू निचिते, शजयराम उंद्रु निचिते, विठ्ठल जानू निचिते, मारुती निचिते, भाऊ निचिते, वसंत निचिते, रमेश पितांबरे, जयराम महादू निचिते, सचिन निचिते, अजय निचिते, श्री. महादू निचिते, गजानन घोडविंदे, शरद घोडविंदे, प्रसाद निचिते, प्रवीण भोईर यांनी उपस्थिती दर्शविली. आसनगाव येथून चंद्रकांत चंदे, श्रीकांत चौधरी व निखील चंदे उपस्थित होते. वालशेत येथून विष्णू निचिते, रमेश कांतीलाल निचिते, दिनेश घनघाव आवर्जून उपस्थित राहिले. यावेळी काजळविहीर गावातील शाळकरी विद्यार्थ्यांची उपस्थिती विशेष उल्लेखनीय होती.
संपूर्ण कार्यक्रमाचे संयत, नेटक्या आणि प्रभावी शब्दांत सूत्रसंचालन अनिल निचिते यांनी केले. तर आभार प्रदर्शन रमेश निचिते यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आम्ही भारतीय लोक संघटनेचे अध्यक्ष अनिल निचिते, उपाध्यक्ष रमेश निचिते, सचिव भरत निचिते, कार्याध्यक्ष डॉ. संजय निचिते, सहसचिव धीरज निचिते, खजिनदार शजनार्दन निचिते, संघटक शप्रकाश मारुती निचिते, रवींद्र दिनकर, प्रकाश मालू निचिते, अरुण निचिते, चंद्रकांत निचिते, प्रवीण निचिते, शरद निचिते, अरुण तुकाराम निचिते, रवींद्र निचिते यांनी विशेष मेहनत घेतली.
संविधान मूल्यांवर आधारित अशा या उपक्रमाने काजळविहीर गावात लोकशाही, समानता आणि बंधुतेचा संदेश दृढपणे रुजविला.


Post a Comment
0 Comments