Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

केडीएमसी निवडणूक ;14 लाखांहून अधिक मतदार आणि 1600 च्या आसपास मतदान केंद्र तर 9 ठिकाणी मतमोजणी होण्याची शक्यता (1/2)

वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज

{संपादकीय}

कल्याण दि.19 डिसेंबर : येत्या 15 जानेवारी रोजी होणाऱ्या केडीएमसीच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये 14 लाख 24 हजारांहून अधिक मतदार असून सुमारे 1583 मतदान केंद्र असून यंदा प्रथमच 9 वेगवेगळ्या ठिकाणी मतमोजणी होण्याची शक्यता आहे. तर कल्याण- डोंबिवली महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूकीची आचारसंहिता लागू झाली असून तिच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी एसएसटीसह विविध पथके कार्यान्वित करण्यात आल्याची माहिती आयुक्त अभिनव गोयल यांनी दिली. महापालिका निवडणुकीसंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. केडीएमसी निवडणुकीसाठी मतदान १५ जानेवारी आणि मतमोजणी निकाल १६ जानेवारी जाहीर होणार आहेत.


महानगरपालिकेतील एकूण ३१ प्रभागांसाठी शासनामार्फत ९ रिटर्निंग ऑफिसर्स (RO) आणि त्यांच्या सहाय्यासाठी प्रत्येकी ३ सहाय्यक रिटर्निंग ऑफिसर्स (ARO) यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यांच्या जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या असून, संबंधित तपशील लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहे.


आदर्श आचारसंहिता लागू झाल्यानंतर निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांची एमसीसी (Model Code of Conduct) नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आचारसंहितेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी स्टॅटिक सर्व्हेलन्स टीम्स (SST), फ्लाइंग स्क्वॉड टीम्स (FST), व्हिडिओ सर्व्हेलन्स टीम्स (VST) तसेच खर्च निरीक्षण पथके कार्यान्वित करण्यात येत आहेत. पोलीस आणि उत्पादन शुल्क विभागाच्या समन्वयाने सीमावर्ती भागात ९ ठिकाणी तपास पथके स्थापन केली जाणार आहेत.


मतदान केंद्रांबाबत माहिती देताना आयुक्तांनी सांगितले की, सध्या १५८३ मतदान केंद्रे प्रस्तावित असून, रिटर्निंग ऑफिसर्सकडून अंतिम पाहणी झाल्यानंतर २० डिसेंबर २०२५ रोजी मतदान केंद्रांची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाईल.


निवडणूक प्रक्रियेसाठी ‘सिंगल विंडो परमिशन सिस्टीम’ लागू करण्यात आली असून, प्रत्येक RO स्तरावर तसेच मुख्यालयात स्वतंत्र सुविधा कक्ष कार्यरत राहणार आहे. सभा, मिरवणूक, वाहन परवाने, बॅनर्स, पोस्टर्स आदींसाठी निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार परवानग्या देण्यात येतील. संपूर्ण महानगरपालिका क्षेत्रात प्रचारासाठी वाहन वापरास मुख्यालयातून परवानगी आवश्यक राहील, तर प्रभागस्तरावरील कार्यक्रमांसाठी संबंधित RO स्तरावर परवानगी उपलब्ध असेल.(1/2)



Post a Comment

0 Comments