Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

उमीद कार्ड शिबीर यशस्वी; 30 ते 40 सेवानिवृत्त कामगारांना लाभ

 

वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज

आनंदा भालेराव

नॅशनल रेल्वे मजदुर युनियन मुख्यालय व ऑल इंडिया रेल्वे पेंशनर वेल्फेयर अधिकारी, मुंबई मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने, आदरणीय काॅ. वेणु पी. नायर (महामंत्री, मध्य रेल्वे/कोकण रेल्वे) यांच्या खंबीर नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाने कल्याण–कसारा विभागातील सर्व सेवानिवृत्त कामगारांसाठी उमीद कार्ड शिबीर वासिंद पी. डल्बु आय. डेपो येथे आयोजित करण्यात आले.

दिनांक 20/12/2025 रोजी सकाळी 11.00 ते 4.00 वाजेपर्यंत आयोजित या शिबिरास कल्याण–कसारा विभागातील सेवानिवृत्त कामगारांनी वेळेवर उपस्थित राहून लाभ घेतला. शिबिरादरम्यान किमान 30 ते 40 सेवानिवृत्त कामगारांची उमीद कार्डे काढण्यात आली.

शिबीर यशस्वी करण्यासाठी ऑल इंडिया रेल्वे पेंशनर वेल्फेयर अधिकारीचे काॅ. वसंत कासार (ऑर्गनायझिंग सेक्रेटरी, मुंबई), काॅ. आनंदा भालेराव (सचिव, मुंबई मंडळ), आयु. मधुकरजी गायकर, समाजसेवक वासिंद, काॅ. नंदु बोंडवे (अध्यक्ष, वासिंद शाखा), काॅ. अशोक महाजन (खजिनदार, वासिंद शाखा), काॅ. विद्याधर जाधव (ऑर्गनायझिंग सेक्रेटरी, वासिंद शाखा) व कार्यकारिणी सदस्य, तसेच कसारा शाखेचे काॅ. प्रल्हाद खंदारे (अध्यक्ष), काॅ. दिलीप वेंखडे (सेक्रेटरी), काॅ. दिलीप शिंदे (ऑर्गनायझिंग सेक्रेटरी), काॅ. अशोक सोनावने (खजिनदार), काॅ. गुलाब शिंदे (उपाध्यक्ष), भगवान पंडित (सदस्य) आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रशासनाकडून कल्याण–कसारा विभागातील वेल्फेयर अधिकारी व सेटलमेंट विभागातील सर्व अधिकारी उपस्थित राहून मोलाचे सहकार्य केले.

शेवटी घोषणांनी परिसर दणाणला—

काॅ. वेणु पी. नायर महामंत्री जीके लाल सलाम!

एन.आर.एम.यू. जिंदाबाद!

ऑल इंडिया रेल्वे पेंशनर वेल्फेयर अधिकारी जिंदाबाद!

Post a Comment

0 Comments