Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आसनगाव रेल्वे स्टेशन परिसरात सामाजिक बांधिलकीचा अनोखा उपक्रम


वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज

शहापूर-शंकर गायकवाड

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आसनगाव परिसरात सर्व समाज बांधवांनी एकत्र येत समाजहिताचा आणि मानवतेचा संदेश देणारा उपक्रम अत्यंत उत्साहात पार पाडला. आसनगाव रेल्वे स्टेशनच्या पुलाजवळ मोठ्या प्रमाणावर ये-जा करणाऱ्या प्रवाशांना थंड पाणी, बिस्कीट, चिवडा आणि केळी यांचे वाटप करण्यात आले.

बाबासाहेबांच्या स्मृतीदिनानिमित्त आयोजित या उपक्रमातून त्यांच्या समता, बंधुता आणि मानवसेवेच्या विचारांना प्रत्यक्ष कृतीतून उजाळा देण्यात आला.


या उपक्रमाला वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूजचे प्रतिनिधी भेट देऊन अधिक उर्जा दिली.

शंकर गायकवाड, बाळकृष्ण सोनवणे, ऍडव्होकेट अमर भरीत, विजय सोष्टे,

अजय कांबळे, रवींद्र घणघाव, हरेश भवार, नितीन उबाळे,

जैवंत हजारे यांनी या ठिकाणी येऊन सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले तसेच कार्यकर्त्यांचे मनोबल वाढविले.



उपक्रमाच्या यशस्वी आयोजनामध्ये पुढील कार्यकर्त्यांचे अमूल्य योगदान लाभले—

रवींद्र जाधव, मंगेश भडांगे, विकास अभंग, मिथुन जाधव,

आर्यन उबाळे, मनोज जाधव, श्रीकांत गायकवाड, मयूर जाधव,

नितीन जाधव यांनी विविध जबाबदाऱ्या सांभाळत नियोजन, व्यवस्थापन आणि वाटपाची उत्तम मांडणी केली.


सामाजिक सलोखा, सेवा आणि मानवतेचे प्रतीक ठरणारा हा उपक्रम आसनगाव परिसरातील नागरिकांसाठी प्रेरणादायी ठरला. समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन केलेल्या या उपक्रमातून बाबासाहेबांच्या विचारांना सन्मानपूर्वक वंदन करण्यात आले आणि नव्या पिढीसमोर सेवा आणि समतेचे एक आदर्श उदाहरण उभे राहिले.



Post a Comment

0 Comments