वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज
कल्याण : दिनांक 10 डिसेंबर 2025 रोजी आयोजित दिव्यांगजन दिन कार्यक्रमात सेंट्रल रेल्वेच्या वतीने उल्लेखनीय सेवेसाठी दोन कर्मचाऱ्यांना ‘रोल मॉडेल अवॉर्ड’ प्रदान करण्यात आला. हा मानाचा पुरस्कार सेंट्रल रेल्वेचे आदरणीय जनरल मॅनेजर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
इलेक्ट्रिक लोको शेड, कल्याण येथील
🔹 कृष्णा संजय वाघ – इलेक्ट्रिक फिटर ग्रेड-3
🔹 सरला अतुल गुप्ता – FTR-1
या दोन्ही कर्मचाऱ्यांनी सातत्यपूर्ण परिश्रम, कर्तव्यनिष्ठा आणि आदर्श कार्यशैलीमुळे सर्वांसमोर एक प्रेरणादायी उदाहरण घालून दिले आहे.
सदर कार्यक्रमात उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांनी दोन्ही सन्मानित व्यक्तींना हार्दिक शुभेच्छा दिल्या. रेल्वे प्रशासनाने त्यांच्या कार्याची दखल घेत दिलेला हा सन्मान सर्व कर्मचाऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरणारा आहे.



Post a Comment
0 Comments