Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

सावरोली (सो) येथे भात खरेदी केंद्र सुरू : डॉ. तरुलता धानके यांच्या पुढाकाराला प्रशासनाची तत्काळ दखल संकटग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी जलद निर्णय

वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज 

शहापूर-शंकर गायकवाड

अतिवृष्टीमुळे किन्हवली व आसपासच्या भागातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी भात खरेदी केंद्र सुरू करावे, अशी मागणी सातत्याने होत होती. या मागणीचा ठोस आवाज बनून महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ, उपप्रादेशिक कार्यालय शहापूर येथे डॉ. तरुलता धानके यांनी भेट देत अधिकार्‍यांशी सविस्तर चर्चा करून लेखी निवेदन सादर केले.


त्यांच्या निवेदनाची प्रशासनाने तात्काळ दखल घेत सावरोली (सो) येथे भात खरेदी केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला. केंद्र सुरू होताच शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हलकी आशेची किरणे उमटली.

यानंतर डॉ. तरुलता धनके यांनी स्वतः केंद्राला प्रत्यक्ष भेट देऊन संपूर्ण प्रक्रियेची पाहणी केली. केंद्रातील अधिकाऱ्यांशी चर्चा करताना त्यांनी खरेदी प्रक्रियेची गती, सोयी-सुविधा, शेतकऱ्यांना मिळणारे मार्गदर्शन व कागदपत्रांची पूर्तता याबाबत माहिती घेतली.


भात खरेदी केंद्रात उपस्थित अनेक शेतकऱ्यांशी त्यांनी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. शेतकऱ्यांनी वजन काट्यांविषयीची दिरंगाई, ओझे उतरवण्यातील विलंब, रांगेत थांबण्याची गैरसोय अशा अनेक अडचणींचा उल्लेख केला. काही ठिकाणी पाण्याची आणि सावलीचीही कमतरता असल्याचे निदर्शनास आले.

या सर्व मुद्द्यांची गंभीरतेने दखल घेत शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये, तसेच खरेदी प्रक्रिया पारदर्शक आणि जलद व्हावी यासाठी डॉ. धनके यांनी केंद्रातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी तातडीची चर्चा केली.

शेतकऱ्यांच्या सुविधांसाठी आवश्यक व्यवस्था त्वरित करण्याचे निर्देशही त्यांनी संबंधितांना दिले.


त्यांच्या पुढाकारामुळे शेतकऱ्यांच्या समस्या कमी होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

स्थानिक शेतकरी वर्गातून डॉ. धानके यांच्या वेळेवर केलेल्या हस्तक्षेपाचे व प्रयत्नांचे कौतुक व्यक्त केले जात आहे.




Post a Comment

0 Comments