वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज
शंकर गायकवाड
महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाच्या उपप्रादेशिक कार्यालय, शहापूर येथे डॉ. तरुलता धानके यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी अतिवृष्टीमुळे गंभीर संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले.
किन्हवली परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे भात पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना तात्काळ दिलासा मिळावा, यासाठी किन्हवली येथे भात खरेदी केंद्र त्वरित सुरू करण्यात यावे, अशी ठोस मागणी डॉ. धानके यांनी माननीय उपप्रादेशिक अधिकारी यांच्याकडे केली.
यासंदर्भात उपप्रादेशिक अधिकारी यांच्याशी सविस्तर चर्चा करून शेतकऱ्यांच्या अडचणी, उत्पादनाची सद्यस्थिती व खरेदी प्रक्रियेतील अडथळे यावर उपाययोजना करण्याबाबत विचारमंथन करण्यात आले. चर्चेअंती डॉ. तरुलता धानके यांनी अधिकृत निवेदन सादर केले.
भात खरेदी केंद्र तातडीने सुरू झाल्यास शेतकऱ्यांना योग्य दर मिळून आर्थिक दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. प्रशासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.


Post a Comment
0 Comments