Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

खातवली केंद्रस्तरीय विविध गुणदर्शन स्पर्धेत जिल्हा परिषद शाळा वेहलोळी बौद्ध पाडा हिचे ऐतिहासिक यश

वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज 

आनंदा भालेराव

खातवली केंद्रांतर्गत आयोजित केंद्रस्तरीय विविध गुणदर्शन स्पर्धा मंगळवार दिनांक 09 डिसेंबर 2025 रोजी अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाल्या. या स्पर्धांमध्ये जिल्हा परिषद शाळा, वेहलोळी बौद्ध पाडा येथील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांच्या जोरावर दैदीप्यमान यश संपादन करत शाळेचा व गावाचा नावलौकिक जिल्हास्तरावर उंचावला.


लोककला, लोकसंगीत, लोकनृत्य, नाट्य, तसेच शैक्षणिक साहित्य निर्मिती अशा विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कलात्मक आणि अभ्यासपूर्ण सादरीकरणाने सर्व उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. शाळेतील वर्गशिक्षकांनी घेतलेल्या सातत्यपूर्ण मेहनतीमुळे आणि योग्य मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांनी प्रत्येक स्पर्धेत आत्मविश्वासपूर्ण सादरीकरण केले.

नाट्य स्पर्धेत शाळेने प्रथम क्रमांक मिळवून आपल्या अभिनयकौशल्याचा ठसा उमटवला. त्याचप्रमाणे समूह गायन स्पर्धेतही प्रथम क्रमांक पटकावत विद्यार्थ्यांनी संगीत क्षेत्रातील आपली गुणवत्ता सिद्ध केली. यासोबतच शैक्षणिक साहित्य निर्मिती स्पर्धेत श्री. संतोष जाधव सर यांनी प्रथम क्रमांक मिळवून शाळेच्या सर्जनशीलतेचा आणि शैक्षणिक गुणवत्तेचा प्रत्यय दिला.


या सर्व स्पर्धांतील अभूतपूर्व यशामुळे शाळेतील विद्यार्थी, शिक्षक, पालक तसेच वेहलोळी बौद्ध पाडा व परिसरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत असून, अनेक मान्यवरांनी शाळेच्या या यशाचे कौतुक करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.


शाळेने मिळविलेल्या या उज्वल यशाबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे, मार्गदर्शक शिक्षकांचे व विशेषतः श्री. संतोष जाधव सर यांचे सर्वत्र हार्दिक अभिनंदन होत आहे. भविष्यातही अशीच भरीव कामगिरी करून शाळेने शैक्षणिक, सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रात नवे शिखर गाठावे, अशा शुभेच्छा परिसरातील नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत.



Post a Comment

0 Comments