वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज
सोशल मीडिया संपादक- मोहन दिपके
दि. ३०/११/ २०२५ रोजी मौजे आखाडा बाळापूर येथे पंजाबराव मोरे यांचा निर्घृण खुन करण्यात आला असुन अद्याप दोन आरोपिंना अटक करण्यात आली आहे.परंतु सदर गुन्ह्यामध्ये आनखी काही आरोपींचा सहभाग आसुन पोलिस प्रशासन आरोपींना पाठिशी घालून आरोपींना सहाय्य करत असल्याची माहिती पिडित कुटुंबांने दिली असल्याने इतर आरोपी निष्पन्न करण्यासाठी आरोपिंची ब्रेन मॅपिंग चाचणी करण्यात यावी व आरोपींनी गुन्ह्यांमध्ये वापरलेली गाडी व गाडि मध्ये प्रेत घेऊन जात असतानाच्या मार्गावर असलेले व घटनास्थळावर आसलेले सर्व सि.सी. टि.व्ही. फुटेज तपासुन इतर आरोपींना पाठिशी न घालाता गुन्ह्यांमध्ये आरोपी करून तात्काळ अटक करावे,
तसेच गुन्हाचा तपास हा गुणवत्तेवर आधारित पारदर्शक करण्यात यावा, आरोपींना शिक्षा व्हावी यासाठी पुण्यामध्ये ॲट्रॉसिटी चे खटले हाताळण्याचा अनुभव असलेल्या वरिष्ठ विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती करण्यात यावी, पीडित कुटुंबाचे घर नोकरी जमीन पेन्शन देऊन पुनर्वसन करण्यात यावे तसेच खटला संपेपर्यंत फिर्यादी, पीडित व साक्षीदार यांना सशस्त्र पोलीस संरक्षण देण्यात यावे, गुन्ह्याचा तपासाच्या प्रगती बाबत वेळोवेळी फिर्यादी पीडितांना लेखी कळवावे या मागण्यांसह इतर महत्त्वांच्या विस मागण्यांचे निवेदन नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टीस एन.डी.एम.जे. या सामाजिक संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी हिंगोली, पोलीस अधीक्षक हिंगोली, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग हिंगोली व उपविभागीय पोलीस अधिकारी हिंगोली ग्रामीण यांची भेट घेऊन दिले आहे.
सदरील निवेदनावर संघटनेचे मराठवाडा प्रदेशाध्यक्ष, जगदीप वसंतराव दिपके, जिल्हाध्यक्ष मोहन मदन दिपके, जिल्हा सचिव दलित नामदेव दिपके, ता. अध्यक्ष करण रोहिदास कुर्हे, संजय नामदेव दिपके, रवी उत्तमराव घोंगडे, नितीन बाळू पंडित, गोरख उमराव पंडित, सय्यद हयात सय्यद महेबुब, वैभव वैजनाथ दिपके इत्यादी पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.




Post a Comment
0 Comments