वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज
टिटवाला (ता. कल्याण, जि. ठाणे) : आनंदा भालेराव
दिनांक 28 डिसेंबर 2025 रोजी जय गणेश डेव्हलपमेंट – कळस दर्शन या नवीन प्रोजेक्टमधील तयार झालेल्या इमारतीत बिल्डिंग नंबर 2, रूम नंबर 108 येथे काॅ. आनंदा धोंडीबा भालेराव (सचिव, ऑल इंडिया रेल्वे पेंशनर वेल्फेयर फेडरेशन तसेच वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज चॅनलचे प्रतिनिधी) यांची सुकन्या आयु. दिपाली/सचिन बारकु गायकवाड (मु. जामधर, ता. मुरबाड, जि. ठाणे) यांनी आपल्या मालकी हक्काच्या घराचा ताबा औपचारिकरीत्या घेतला.
दोन्ही उभयतांनी अपार मेहनत, कष्ट व चिकाटीच्या जोरावर स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न साकार केले. तीन भावंडांच्या सहकार्याने व मार्गदर्शनाने हे यश साध्य झाल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
या आनंददायी प्रसंगी सर्व नातेवाईक, मित्रपरिवार व हितचिंतकांकडून मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या पुढील वाटचालीस लाख लाख शुभेच्छा देण्यात येत आहेत.
![]() |
| वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज |



Post a Comment
0 Comments