वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज
अंबरनाथ | शंकर गायकवाड
दि. 25 डिसेंबर रोजी मनुस्मृती दहन दिन तसेच भारतीय स्त्री मुक्ती दिवस निमित्त अंबरनाथ येथील आंबेडकर नगर परिसरात महिलांना केंद्रस्थानी ठेवून विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात नगरातील दोन्ही स्तंभांवर तसेच भारतीय संविधानाच्या पुस्तकासमोर पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी उपस्थित महिलांना व मुलींना मनुस्मृती दहन दिनाचे ऐतिहासिक महत्त्व तसेच भारतीय संविधानाने दिलेले समानतेचे व हक्कांचे महत्त्व समजावून सांगण्यात आले.
कार्यक्रमादरम्यान महिलांना व मुलींना पुढे येऊन आपले विचार मांडण्याची संधी देण्यात आली. अनेक महिलांनी आत्मविश्वासाने आपली मते मांडत उत्तम प्रतिसाद दिला. यामुळे कार्यक्रमाला संवादात्मक व प्रेरणादायी स्वरूप प्राप्त झाले.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांचे आभार मानत, “एकत्र येऊत, वैचारिक होऊत” असे आवाहन करण्यात आले. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महिला व मुली उपस्थित होत्या. संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि प्रेरक वातावरणात पार पडला.



Post a Comment
0 Comments