वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज
शंकर गायकवाड
परंपरागत कृषी विकास योजना (PKVY) अंतर्गत सेंद्रिय शेतीला चालना देण्यासाठी सन खरीप हंगाम 2025-26 मध्ये शहापूर तालुक्यातील नडगाव परिसरात गाव पातळीवरील शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला. प्रकल्प संचालक आत्मा ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली नडगाव परिसर शेतकरी उत्पादक कंपनी लि., नडगाव (ता. शहापूर, जि. ठाणे) यांच्या वतीने एकूण 25 शेतकरी गटांचे प्रशिक्षण घेण्यात आले.
दि. 25 ऑक्टोबर 2025 ते 20 डिसेंबर 2025 या कालावधीत नडगाव, कळगाव, असनोली, आपटे, गणेशवाडी, आल्याणी, टेम्भरे, भागदळ आदी परिसरात हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमातून सुमारे 500 पुरुष व महिला शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीविषयक सखोल मार्गदर्शन देण्यात आले.
प्रशिक्षणास शेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक, विविध गटांचे सदस्य, मास्टर ट्रेनर तसेच आत्माचे प्रतिनिधी श्री. जितेश खांडगे व श्री. विनोद कदम उपस्थित होते. यावेळी आदिवासी युवा संघटना शहापूर तालुक्याचे अध्यक्ष श्री. जगू निरगुडा यांनीही उपस्थिती दर्शवली.
इनौरा बायोटेकचे श्री. अमर धायगुडे व श्री. सुरज गायकवाड यांनी सेंद्रिय शेतीचे महत्त्व, सेंद्रिय प्रमाणिकरण, जैविक कीड व रोग व्यवस्थापन, जैविक निविष्ठा केंद्र स्थापना तसेच जीवामृत, बीजामृत, गांडूळ पाणी व कंपोस्ट खत निर्मितीबाबत प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन केले.
हा प्रशिक्षण कार्यक्रम प्रकल्प संचालक आत्मा मा. श्री. रामेश्वर पाचे साहेब, प्रकल्प उपसंचालिका श्रीम. मनाली तांबडे मॅडम व तालुका कृषी अधिकारी शहापूर श्री. कुमार जाधव साहेब यांच्या नियोजित मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पूर्ण झाला. सेंद्रिय शेतीकडे वळण्यासाठी हा उपक्रम शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरल्याचे सहभागी शेतकऱ्यांनी सांगितले.


Post a Comment
0 Comments