वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज
मुंबई | शंकर गायकवाड
आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस यांची अधिकृत युती जाहीर करण्यात आली आहे. या युतीअंतर्गत वंचित बहुजन आघाडी एकूण ६२ जागांवर निवडणूक लढवणार आहे.
युतीची घोषणा वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष धैर्यवर्धन पुंडकर आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत केली. यावेळी काँग्रेस नेते सचिन सावंत उपस्थित होते.
पत्रकार परिषदेत वंचित बहुजन आघाडीचे मुख्य प्रवक्ते व राज्य उपाध्यक्ष सिद्धार्थ मोकळे यांनी दोन्ही पक्षांमध्ये झालेल्या सहमतीची सविस्तर माहिती दिली. युतीचा उद्देश मुंबई महानगरपालिकेत सर्वसामान्य, वंचित आणि कामगार वर्गाचा आवाज अधिक प्रभावीपणे मांडणे हा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे मुंबई प्रदेशाध्यक्ष चेतन अहिरे, महिला आघाडी मुंबई प्रदेशाध्यक्ष स्नेहल सोहनी तसेच युवा आघाडी मुंबई प्रदेशाध्यक्ष सागर गवई हेही उपस्थित होते.
या युतीमुळे मुंबई महापालिका निवडणुकीत राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता असून, महाविकासाच्या राजकारणात नव्या घडामोडींना वेग येण्याची चिन्हे दिसत आहेत.


Post a Comment
0 Comments