वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज
शंकर गायकवाड
किन्हवली : विद्या प्रसारक संस्थेच्या शहा विद्यालयात शनिवार दिनांक १३ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी २.०० वाजता इयत्ता बारावी कला व वाणिज्य शाखेची संयुक्त पालकसभा उत्साहात संपन्न झाली. ही पालकसभा संस्थेचे अध्यक्ष आप्पासाहेब भानुशाली यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती.
या पालकसभेस डॉ. तरुलता धानके मॅडम (सेवानिवृत्त अधिकारी) यांनी प्रमुख मार्गदर्शक म्हणून विद्यार्थ्यांना अभ्यास, करिअर नियोजन व शैक्षणिक वाटचालीसंबंधी मोलाचे मार्गदर्शन केले. अध्यक्ष आप्पासाहेब भानुशाली यांनी विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमाबाबत तसेच त्यांना भेडसावणाऱ्या विविध शैक्षणिक अडचणी व समस्या जाणून घेतल्या. यावेळी पालक व विद्यार्थ्यांनीही आपली मनोगते व्यक्त केली.
या कार्यक्रमास विद्या प्रसारक संस्थेचे उपाध्यक्ष खंडू मामा विशे, सचिव दत्तात्रयजी करण, पालक प्रतिनिधी विठ्ठल गगे गुरुजी, उपमुख्याध्यापक एम. व्ही. होळीकर, पर्यवेक्षक एस. जी. निळे, सांस्कृतिक विभाग प्रमुख श्रीमती अर्चना देसले, ज्युनिअर विभाग प्रमुख सौ. ए. ए. जाधव, ज्येष्ठ शिक्षक डी. के. विशे, वाणिज्य विभाग प्रमुख एस. व्ही. पतंगराव तसेच कला व वाणिज्य शाखेतील सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक गोपाळ वेखंडे यांनी केले. सुत्रसंचालन रिकी खाडे यांनी तर आभार प्रदर्शन विनोद फर्डे यांनी केले. छायाचित्रणाची जबाबदारी पी. डी. जाधव यांनी तर ध्वनिव्यवस्थेची सुविधा बी. डी. वरकुटे यांनी सांभाळली.
ही पालकसभा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी मार्गदर्शक ठरली असून पालक-शिक्षक संवाद अधिक दृढ झाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.




Post a Comment
0 Comments