Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

चंद्रपुरात नवी राजकीय समीकरणे; वंचित आणि शिवसेना (उबाठा) मध्ये 'समसमान' जागावाटपाची चर्चा!

वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज 

शंकर गायकवाड

चंद्रपूर: आगामी चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. वंचित बहुजन आघाडीच्या चंद्रपूर महानगर कार्यालयात वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत प्रामुख्याने '५०-५० टक्के' जागावाटपाच्या धोरणावर चर्चा करण्यात आली.


वंचित बहुजन आघाडीचे महानगर अध्यक्ष स्नेहल रामटेके यांनी शिवसेना (उबाठा) जिल्हाप्रमुख संदीप गिरे यांना चर्चेसाठी निमंत्रित केले होते. 


आगामी निवडणुकीत दोन्ही पक्षांनी एकत्रितपणे सामोरे जावे आणि जागांचे वाटप समसमान असावे, यावर या बैठकीत प्राथमिक खलबते झाली.


बैठकीतील प्रमुख उपस्थिती:

वंचित बहुजन आघाडीचे स्नेहल रामटेके (महानगर अध्यक्ष), तनुजा (महानगर महिला आघाडी), रूपचंद निमगडे (जिल्हा उपाध्यक्ष पश्चिम), सुभाषचंद्र ढोलणे (सहसचिव) तसेच 

शिवसेना (उबाठा) पक्षाचे संदीप गिरे (जिल्हा प्रमुख), सुरेश पचारे (शहर महानगर प्रमुख), सतीश भिवगडे (माजी जिल्हा प्रमुख) आदी उपस्थित होते.



Post a Comment

0 Comments