वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज✍️
सोशल मीडिया संपादक मोहन दिपके
डीग्रस (क), जि. हिंगोली – भीमस्तंभ स्थापन करणाऱ्या सर्व भीमसैनिकांचा भव्य स्वागत सत्कार समारंभ नालंदा बुद्ध विहार परिसरात १ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी सात वाजता मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून तसेच त्रिसरण–पंचशील ग्रहण करून करण्यात आली.
यानंतर पुणे येथील भंते धम्मानंद यांनी प्रेरणादायी प्रवचन दिले. आगामी २ फेब्रुवारी २०२६ रोजी दिल्लीतील आझाद मैदानावर होणाऱ्या महाबोधी महाविहार मुक्त आंदोलनात हिंगोली जिल्ह्यातील सर्व भीमसैनिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी या प्रसंगी केले.
भिमनगर येथील तरुणांचे विद्यमान सरपंच सिद्धार्थ इंगळे (रा. समगा, ता. व जि. हिंगोली) यांच्या वतीने भीमस्तंभ स्थापन केल्याबद्दल शंभर भीमसैनिकांचा निळ्या शाली व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यानंतर सिद्धार्थ इंगळे यांनी मनोगत व्यक्त करून संविधान मूल्यांची जनजागृती करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिद्धार्थ कु-हे यांनी केले, तर आभार प्रदर्शनाचे मान बाबुराव कु-हे यांच्याकडे होते.
कार्यक्रमाला संदीप कु-हे, पांडुरंग खंदारे, बाबुराव कु-हे, धम्मदीप कु-हे, राजू कुऱ्हे, आकाश कु-हे, रोहन कु-हे, संपना कु-हे, अलका कु-हे, दैवशाला कु-हे, सुमनबाई कु-हे, रेखाबाई कु-हे, पुष्पाबाई कु-हे, सागरबाई इंगळे, रमाबाई कु-हे आदींसह सर्व बौद्ध उपासकांचा उपस्थिती लाभला.


Post a Comment
0 Comments