वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज
शंकर गायकवाड
टाकीपठार (ता. शहापूर) : मॉडेल स्वयंचलित स्वच्छता यंत्र या माध्यमिक गटातील स्पर्धेत टाकी पठार आश्रम शाळेने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. शाळेतील विद्यार्थिनी कु. वैशाली मेंगाळ व अनंता वाघ यांनी उत्कृष्ट सादरीकरण करत तृतीय क्रमांक पटकावला असून, त्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.
या यशाबद्दल टाकी पठार आश्रम शाळेचे मुख्याध्यापक श्री. देशमुख सर तसेच सर्व शिक्षकवृंद यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळेतील शिक्षक सातत्याने प्रयत्नशील असून, त्यांच्या मार्गदर्शनामुळेच हे यश शक्य झाले असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
टाकी पठार परिसरातील ही एकमेव आदिवासी आश्रम शाळा असून, येथे विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणासह निवास, भोजन व इतर आवश्यक सुविधा उत्तम प्रकारे उपलब्ध करून दिल्या जातात. याच सकारात्मक वातावरणामुळे विद्यार्थी शैक्षणिक, बौद्धिक व नवोन्मेष क्षेत्रात प्रगती करत आहेत.
या दोन्ही विद्यार्थ्यांचे शाळेच्या वतीने औपचारिक स्वागत करण्यात आले असून, पुढील स्पर्धेसाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.


Post a Comment
0 Comments