वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज✍️
मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त होणाऱ्या लाखोंच्या गर्दीचा विचार करून प्रशासनाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व विभागांच्या कार्ययोजना तपासल्या.
यावेळी महापरिनिर्वाण दिनासाठी विशेष तयार करण्यात आलेल्या पोस्टरचे अनावरण तसेच माहिती पुस्तिकेचे प्रकाशनही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.
फडणवीस म्हणाले की, देशभरातून लाखो अनुयायी चैत्यभूमी आणि मुंबईत श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी येतात. त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेसाठी, वाहतूक व्यवस्थेसाठी आणि सर्व सोयीसुविधांसाठी संबंधित सर्व विभागांनी समन्वय साधून काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
चैत्यभूमी येथे उभारण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नव्या पुतळ्यासंदर्भात विविध सूचनांचा आढावा घेतल्यानंतर, यासाठी विशेष समन्वय समिती स्थापन केली जाणार असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले.
या बैठकीस सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ, माजी मंत्री विजय गिरकर, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी, कोकण विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह, बेस्ट महाव्यवस्थापक सोनिया सेठी, मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती, मुंबई शहर जिल्हाधिकारी आंचल गोयल, तसेच महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे यांसह विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.




Post a Comment
0 Comments