वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज
कसारा | प्रतिनिधी
कसारा गावातील आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते तसेच मध्य रेल्वे माटुंगा कारखान्यात रेल्वे सेवा करणारे आयु. सचिन चंद्रकांत पगारे यांच्या वाढदिवसानिमित्त परळ ग्राउंड येथे आयोजित NRMU युवा महोत्सव 2025 कार्यक्रमात विशेष आशिर्वाद भेट घेण्यात आली.
हा कार्यक्रम NRMU संघर्षनायक सन्माननीय महामंत्री कॉम. वेणु पी. नायर यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहात पार पडला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी आयु. सचिन पगारे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या सामाजिक व संघटनात्मक कार्याचे कौतुक केले.
आंबेडकरी चळवळ व रेल्वे कर्मचारी संघटनेतील कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम आनंदी व प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.


Post a Comment
0 Comments