वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज
कार्यकारी संपादक रितेश साबळे
मुंबई : ओबीसी समाजाच्या हक्कांसाठी बाळासाहेब आंबेडकर यांनी नेहमीच स्पष्ट आणि ठाम भूमिका घेतली असून, त्यांच्या कार्याचा ओबीसी समाजाने योग्य वेळी विचार करावा, असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष सोमनाथ साळुंखे यांनी केले आहे.
मंडल आयोगाची अंमलबजावणी व्हावी यासाठी तत्कालीन पंतप्रधान व्ही. पी. सिंह यांच्याकडे *बाळासाहेब आंबेडकरांनी सातत्याने आग्रह धरला होता.* त्यांच्या या भूमिकेमुळेच मंडल आयोग प्रत्यक्षात लागू झाला, असे साळुंखे यांनी सांगितले. तसेच ओबीसी समाजाला ५२ टक्के आरक्षण मिळावे, यासाठीही त्यांनी ठामपणे भूमिका मांडली होती.
ओबीसी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उन्नतीसाठी महाराष्ट्र सरकारने १०० कोटी रुपयांची शिष्यवृत्ती तरतूद करावी, अशी मागणी *बाळासाहेब आंबेडकरांनी* केली होती. केवळ मागण्यांपुरते न थांबता, *‘आरक्षण बचाव यात्रा’* काढून त्यांनी *गावखेड्यांत जाऊन थेट ओबीसी बांधवांशी संवाद साधला आणि त्यांच्या संघर्षात सक्रिय सहभाग घेतला.*
लोकसभा निवडणुकीच्या वेळी महाविकास आघाडीसोबत युतीबाबत चर्चा सुरू असताना, ओबीसी समाजाचे प्रतिनिधित्व मजबूत व्हावे यासाठी १५ ओबीसी उमेदवार देण्याची मागणीही त्यांनी केली होती. ही बाब त्यांच्या ओबीसी समाजाबाबतच्या प्रामाणिक भूमिकेचे द्योतक असल्याचे साळुंखे म्हणाले.
वेळोवेळी ओबीसींच्या प्रश्नांवर ठामपणे उभे राहणाऱ्या बाळासाहेब आंबेडकरांच्या या कार्याची दखल घेऊन, आता ओबीसी समाजाने वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहावे, असे आवाहन सोमनाथ साळुंखे यांनी केले.



Post a Comment
0 Comments