वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज
प्रतिनिधी- शंकर गायकवाड
खरपत नं. २ येथे जय आई भवानी यांच्या वतीने ओव्हरआर्म क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे. हे सामने मंगळवार दि. १६/१२/२०२५ ते शुक्रवार दि. १९/१२/२०२५ या कालावधीत पार पडणार आहेत.
या क्रिकेट सामन्यांना सरपंच, उपसरपंच तसेच सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी भेट देऊन खेळाडूंना प्रोत्साहन दिले. आज आयोजकांच्या निमंत्रणावरून आघार्थ ग्रुप, ग्रामपंचायत सावरली (सो.) तंटामुक्ती अध्यक्ष तथा वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज शहापूर तालुका प्रतिनिधी शंकर गायकवाड यांनीही आपली उपस्थिती दर्शवली. आयोजकांच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला.
विशेष म्हणजे हे क्रिकेट सामने फक्त आदिवासी बांधवांसाठी आयोजित करण्यात आले असून २५ वर्षांखालील वयोगटातील खेळाडूंनाच सहभागाची संधी देण्यात आली आहे. स्पर्धेत शिस्त राखण्यासाठी सर्व खेळाडूंचे आधार कार्ड तपासणी केली जाणार आहे.
हे सामने दरवर्षी खरपत नं. २ येथे मोठ्या उत्साहात संपन्न होत असून, यशस्वी आयोजनासाठी गावातील ग्रामस्थ व तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग लाभतो.
बक्षीस रक्कम :
प्रथम क्रमांक – ₹१५,००० व चषक
द्वितीय क्रमांक – ₹७,००० व चषक
तृतीय क्रमांक – ₹४,००० व चषक
चतुर्थ क्रमांक – ₹४,००० व चषक
अशा प्रकारे हे ओव्हरआर्म क्रिकेट सामने उत्साहात व शिस्तबद्ध वातावरणात पार पडणार आहेत.


Post a Comment
0 Comments