वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज
शंकर गायकवाड
बारामती नगरपरिषद निवडणुकीत बहुजन समाज पार्टीच्या उमेदवार कुमारी संघमित्रा काळूराम चौधरी यांनी प्रभाग क्रमांक ‘अ’ मधून दणदणीत विजय मिळवला आहे. त्या बहुजन समाज पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश महासचिव श्री. काळूराम चौधरी यांच्या कन्या आहेत.
श्री. काळूराम चौधरी गेल्या अनेक वर्षांपासून पक्षाशी एकनिष्ठ राहून कार्यरत असून, पक्षाने दिलेल्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्रात संघटनात्मक व सामाजिक काम करत आहेत. त्यांच्या सातत्यपूर्ण सामाजिक व राजकीय कार्याचा विश्वास जनतेने व्यक्त करत, त्यांच्या कन्येला मोठ्या मताधिक्याने निवडून दिले आहे.
कुमारी संघमित्रा चौधरी यांनी प्रचारादरम्यान नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांना प्राधान्य देत विकासाभिमुख भूमिका मांडली. त्याला बारामतीतील मतदारांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. या विजयामुळे बारामती शहरात बहुजन समाज पार्टीचे संघटन अधिक मजबूत झाले असल्याचे चित्र आहे.
बहुजन समाज पार्टी आपल्या ठाम कार्यपद्धतीने प्रत्येक निवडणुकीला सामोरे जात असून, सर्वसामान्य जनता वर्गीय सहकार्य करत असल्याचे या निकालातून स्पष्ट झाले आहे.


Post a Comment
0 Comments