वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज
कसारा | प्रतिनिधी-आनंदा भालेराव
ऑल इंडिया रेल्वे पेंशनर वेल्फेयर फेडरेशन मुंबई मंडळ, कल्याण–कसारा शाखेच्या वतीने सेवानिवृत्त रेल्वे कामगारांच्या विविध अडचणींबाबत सविस्तर माहिती व मार्गदर्शनासाठी आज दिनांक 22 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 11.00 वाजता कसारा रेल्वे स्थानक येथे महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली.
ही बैठक काॅ. वेणु पी. नायर (महामंत्री, मध्य रेल्वे/कोकण रेल्वे) यांच्या खंबीर नेतृत्वाखाली पार पडली. बैठकीस कसारा परिसरातील सर्व सेवानिवृत्त कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या बैठकीत सेवानिवृत्त कामगारांच्या विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यामध्ये पंधरा वर्ष पूर्ण झालेल्या लाभांविषयी, फॅमिली पेन्शन, तसेच ज्येष्ठ सेवानिवृत्त कामगारांना त्यांच्या निवासस्थानाजवळील स्टेशनवरून पास मिळण्याबाबतच्या अडचणी यावर मार्गदर्शन करून अनेक समस्यांचे निराकरण करण्यात आले.
या बैठकीस मार्गदर्शक म्हणून
काॅ. आनंदा भालेराव (सचिव, मुंबई मंडळ),
काॅ. प्रल्हाद खंदारे (अध्यक्ष, कसारा शाखा),
काॅ. आनंदा समुद्रे (कार्यकारी अध्यक्ष),
काॅ. दिलीप वेंखडे (सेक्रेटरी),
काॅ. दिलीप शिंदे (ऑर्गनायझिंग सेक्रेटरी),
काॅ. आशोक सोनावने (खजिनदार),
काॅ. गुलाब शिंदे (उपाध्यक्ष),
काॅ. बाबुराव वायले (ज्येष्ठ सेवानिवृत्त कामगार)
यांची उपस्थिती लाभली.
यावेळी काॅ. श्रीमती लिलाबाई निकाळे यांची उपाध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली, तर सदर निवडीची अधिकृत घोषणा काॅ. दिलीप वेंखडे (सेक्रेटरी) यांनी केली.
बैठकीचा शेवट उत्साहपूर्ण घोषणांनी करण्यात आला.
“काॅ. वेणु पी. नायर महामंत्री जी के लाल सलाम”,
“एन.आर.एम.यू. जिंदाबाद”,
“ऑल इंडिया रेल्वे पेंशनर वेल्फेयर फेडरेशन जिंदाबाद”
अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या.


Post a Comment
0 Comments