वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज
आनंदा भालेराव
भायखळा येथील मध्य रेल्वे ई.सी.सी. सोसायटी मुख्यालयात झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक व मानवकल्याणकारी दृष्टीकोनातून अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. मध्य रेल्वे, कोकण रेल्वेचे महामंत्री काॅ. वेणु पी. नायर यांच्या खंबीर नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाने ही बैठक पार पडली.
या बैठकीत सोसायटीच्या वेल्फेअर फंडातून सभासदांसाठी विशेष योजना राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार दिनांक १ जानेवारी २०२६ पासून सोसायटीच्या शेअरधारक सभासदांना लाभ देण्यात येणार आहे.
या योजनेअंतर्गत मूक-बधिर, दृष्टिबधिर, कर्णबधिर, मानसिक व शारीरिक दिव्यांग, पोलिओग्रस्त किंवा लकवाग्रस्त सभासदांना रुपये २५,०००/- (पंचवीस हजार रुपये) एकरकमी आर्थिक मदत केवळ एकदाच दिली जाणार आहे.
कायद्याच्या चौकटीत राहूनही मानवीय मूल्यांना प्राधान्य देण्याची भूमिका या निर्णयातून स्पष्ट होते. युनियन ही केवळ संघटना नसून सामाजिक दायित्व आणि संवेदनशीलता जपणारी संस्था आहे, असा सकारात्मक संदेश या निर्णयातून देण्यात आला आहे. कामगार तसेच त्यांच्या कुटुंबीयांच्या हिताचा विचार करत ही योजना अमलात आणली जात आहे.


Post a Comment
0 Comments