वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज
शंकर गायकवाड
शहापूर :-जनकल्याण शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कै. म. ना. बरोरा माध्यमिक विद्यालय व शां. ग. काबाडी उच्च माध्यमिक विद्यालय, शहापूर यांचे वार्षिक स्नेहसंमेलन, बक्षीस व पारितोषिक वितरण समारंभ मंगळवार, दि. ३० डिसेंबर रोजी शहापूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार श्री. पांडुरंग बरोरा साहेब यांच्या अध्यक्षतेखाली अत्यंत उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी गुणवंत विद्यार्थी, विविध क्रीडा स्पर्धांतील यशस्वी खेळाडू तसेच शैक्षणिक व सहशैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व पारितोषिके प्रदान करण्यात आली.
सांस्कृतिक कार्यक्रमांमधून विद्यार्थ्यांनी नृत्य, नाट्य, गीत व विविध कलाविष्कार सादर करत आपली कला, संस्कार व प्रतिभा यांचे सुंदर दर्शन घडवले. उपस्थित पालक व मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे भरभरून कौतुक केले.
या प्रसंगी दत्तात्रय पाटील, दत्तात्रय पांढरे, रमेशजी वणारसे, सोमनाथ काबाडी, संस्थेचे संचालक मंडळ, रुपेशजी गुजरे, महाविद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. किरपण सर, सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल संस्थेच्या वतीने सर्व उपस्थितांचे आभार मानण्यात आले.


Post a Comment
0 Comments