Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

*एनडिएमजे च्या शिष्टमंडळाची बुलढाणा सहाय्यक आयुक्त समाज कल्याण सोबत धोरणात्मक बाबीवर चर्चा*


वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज ✍️

सोशल मीडिया संपादक मोहन दीपके

नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिस एनडिएमजे महाराष्ट्र च्या वतीने महाराष्ट्रातील अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये खुन झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय नोकरी देण्याची मागणी गेल्या पंधरा वर्षांपासून अखंडीतपणे सुरू आहे. एनडिएमजे चे महासचिव एड. डॉ. केवल ऊके यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य सचिव वैभव गिते यांनी मंत्रालयीन स्तरावर सतत पाठपुरावा करून प्रसंगी केंद्रीय अनुसूचित जाती आयोग, मंत्री मंडळी सह मुख्य सचिवापासून ते सर्व प्रकारच्या शासन प्रशासनासोबत समन्वय साधून तसेच निवेदन,धरणे आंदोलन, पोस्ट कार्ड अभियान आदी अभियान राबवून नौकरी चा मार्ग मोकळा केला आहे, सामाजिक न्याय मंत्री संजय सिरसाठ यांनी अधिकृत घोषणा केली व विस नोव्हेंबर रोजी सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव हर्षदिप कांबळे यांच्या सहिने अधिकृत शासन निर्णय काढून नौकरी चा मार्ग मोकळा केला आहे, या साठी लवकरात लवकर अंमलबजावणी करण्यासाठी एनडिएमजे चे राज्य सहसचिव पी.एस.खंदारे व शिष्टमंडळाने बुलढाणा सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांना भेटून सविस्तर चर्चा केली 

बुलढाणा जिल्ह्यात सन 2025 पर्यंत अत्याचारामुळे मृत्यू झालेल्या 18 प्रकरण झाले आहेत. 18 पात्र कुटुंबीयांनी तात्काळ कागदपत्रे दाखल करावीत, असे आवाहन समाजकल्याण सहाय्यक आयुक्त मनोज मेरत यांनी केले आहे.


२८ नोव्हेंबर रोजी समाजकल्याण विभागात घेतलेल्या बैठकीत नोकरीसाठी आवश्यक पात्रता, प्रक्रिया आणि कागदपत्रांची माहिती देण्यात आली.

 शासनाच्या संवेदनशील निर्णयाचा लाभ घेण्यासाठी पात्र वारसांनी त्वरित समाजकल्याण विभागाशी संपर्क साधावा आणि आवश्यक दस्तऐवज दाखल करून प्रस्ताव सादर करावा.

कोणतेही पात्र कुटुंब वंचित राहू नये हा शासनाचा उद्देश आहे, पिडीत कुटुंबातील व्यक्तींना काही तांत्रिक अडचणी आल्यास एनडिएमजे चे बुलढाणा जिल्ह्यातील पदाधिकारी प्रा.दिलीप मोरे9850378022 भारत गवई.8605082313

प्रशांत झिने.9623841020 सुरेश पैठणे.9970220075 दत्तात्रय सिरसाठ.9637823383 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन राज्य सहसचिव पी एस खंदारे 8007468150 यांनी केले आहे.



Tags

Post a Comment

0 Comments