Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

कामगारांच्या न्यायासाठी वंचित बहुजन आघाडीच्या ठिय्या आंदोलनाला यश.

 


वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज

शंकर गायकवाड

तिवसा : राज्य वखार महामंडळ तिवसा येथे अनेक वर्षापासून कामावर असलेल्या कामगारांना कुठलेही कारण नसताना अचानक कामावरून काढल्याच्या बाबीची वंचित बहुजन आघाडीने गंभीर दखल घेत युवा आघाडीचे जिल्हा महासचिव सागर भवते यांच्या नेतृत्वात कामगार, हमाल यांचे समवेत वखार महामंडळाच्या कार्यालयासमोर तीव्र ठिय्या आंदोलन करण्यात आले होते. दिवसभर चाललेल्या ठिय्या आंदोलनाला अखेरीस यश मिळाले आहे.


गेल्या 10 वर्षापेक्षा अधिक काळापासून वखार महामंडळ तिवसा येथे काम करणाऱ्या कामगार व हमालांना डावलून ऐनवेळी बाहेरच्या कामगारांना कामावर रुजू केल्याने 10 वर्षांपासून काम करणाऱ्या कामगारांनी तीव्र संताप व्यक्त केला होता. हमालीच्या दर कट्टयामागे 2 रु कमिशन अधीकारी घेत असल्याचा आरोप सागर भवते यांनी आंदोलयादरम्यान केला आहे.

राज्य वखार महामंडळाच्या अन्यायकारक धोरणाविरोधात वंचित बहुजन आघाडीने आक्रमक भूमिका घेत कामगारांपासून करण्यात येणारी कमिशनखोरी बंद करून पूर्वीपासून कामावर असलेल्या कामगारांना पूर्ववत करण्यात यावे अशी मागणी ठिय्या आंदोलनातून करण्यात आली.


ठिय्या आंदोलनात यावेळी वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट कामगार युनियनचे जिल्हाध्यक्ष विनय बांबोळे, विजय डोंगरे, जिल्हा सदस्य विनोद खाकसे, प्रमोद मुंद्रे, तालुका अध्यक्ष मनीष खरे, युवा आघाडी तालुका अध्यक्ष सचिन जोगे, तालुका महासचिव अमोल जवंजाळ, तालुका उपाध्यक्ष राहुल मनवर, राजकुमार आसोडे, नितीन थोरात सचिन डमके, पवन डमके, अनिकेत लांडे, श्रीकृष्ण निंभोरकर, हेमंत उईके, निलेश काळसरपे, रोषन गावणार, गौरव नेवारे, रवी धुर्वे, अक्षय वानखडे, विकी मंडरी, राजेंद्र नेवारे, आनंद वणवे, नितीन अतकरी, प्रवीण गावंडे, योगेश नेवारे, सुमित गावणार, संतोष धुर्वे, सुरेंद्र मडावी, प्रीतम टेकाम, संजय भलावी, अमित गावणार सह पदाधिकारी व कामगार उपस्थित होते.


आंदोलनाला यश; कामगारांच्या कायम पाठीशी -

गेल्या 10 वर्षापासून वखार महामंडळात हमाल म्हणून काम करणाऱ्या कमगारांनी अधिकाऱ्यांना कमिशन देण्यास नकार दिल्याने त्यांना कामावरून काढण्यात आले होते. आज महामंडळाच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आल्याने दोन्ही मागण्या मान्य करण्यात आल्या आहे.. कामगारांच्या हक्कासाठी वंचित बहुजन आघाडी कायम त्यांच्या पाठीशी असेल.




Post a Comment

0 Comments