![]() |
| ॥ भावपूर्ण आदरांजली ॥ कै. शोभा (जनाबाई) आनंदा भालेराव प्रथम वर्ष स्मृतिदिन |
वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज
संपादकीय
टिटवाला (ता. कल्याण, जि. ठाणे) येथे दि. 27 डिसेंबर 2025, शनिवार रोजी सकाळी 11.00 वाजता रविंद्र रेजिडेन्सी सोसायटी, पंतागण बाजपेई चौकाजवळ कै. शोभा (जनाबाई) आनंदा भालेराव यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त आयोजित केलेला कार्यक्रम अत्यंत भावनिक, प्रेरणादायी व समाजमनाला स्पर्श करणारा ठरला.
कालकथित. शोभा (जनाबाई) भालेराव या केवळ एक कुटुंबवत्सल मातोश्री नसून त्या संस्कार, कर्तव्य, संयम व माणुसकीचा जिवंत आदर्श होत्या. त्या ऑल इंडिया रेल्वे पेंशनर वेल्फेअर फेडरेशन, मुंबई मंडळ सचिव, आर.पी.आय. (सेक्युलर) ठाणे जिल्हा उपाध्यक्ष तसेच वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज चॅनलचे प्रतिनिधी काॅ. आनंदा धोंडीबा भालेराव यांच्या अर्धांगिनी होत. त्यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमात सामाजिक, राजकीय, शैक्षणिक व धार्मिक क्षेत्रातील मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून मातोश्रींना अभिवादन केले.
![]() |
| “मातोश्रींच्या स्मृतींना कुटुंबीयांचे नतमस्तक वंदन” |
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आयु. मधुकरजी थोरात (संघटक, भारतीय बौद्ध महासभा, मुरबाड तालुका) होते. आयु. बौद्धाचार्य चिंतामण खंडागळे व आयु. दिलीपजी धनगर (कार्यालयीन सचिव, भारतीय बौद्ध महासभा) यांनी अत्यंत शांत, शिस्तबद्ध व मंगल वातावरणात धार्मिक विधी पार पाडत मातोश्रींच्या जीवनकार्याचा गौरव केला.
यावेळी आयु. रविंद्रजी चंदने (अध्यक्ष, आर.पी.आय. सेक्युलर ठाणे जिल्हा),मुख्य संपादक आयु. सागरजी रोकडे (वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज चॅनल),आयु. शंकरजी गायकवाड, बाळकृष्ण सोनावणे, सुनीलजी ठेंगे,
ऑल इंडिया रेल्वे पेंशनर वेल्फेअर फेडरेशनचे काॅ. दिलीप वेंखडे (सेक्रेटरी, कसारा शाखा), काॅ. प्रल्हाद खंदारे (अध्यक्ष, कसारा शाखा) यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
मान्यवरांनी आपल्या मनोगतातून कालकथित. शोभा (जनाबाई) भालेराव यांच्या साधेपणा, सेवाभाव, कुटुंबवत्सलता व सामाजिक जाणिवेचा भावनिक उल्लेख केला. “मातोश्री देहाने गेल्या असल्या तरी त्यांच्या विचारांनी व संस्कारांनी त्या आजही आमच्यात जिवंत आहेत,” असे उद्गार यावेळी व्यक्त झाले.
कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी धार्मिक विधी, सामूहिक प्रार्थना व उपस्थित समुदायास भोजनदान करण्यात आले. शांतता, श्रद्धा व मानवतेचा संदेश देणारा हा स्मृतिदिन सोहळा उपस्थितांच्या मनावर दीर्घकाळ ठसा उमटवून गेला.



Post a Comment
0 Comments