वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज
संपादकीय
तळेगाव दाभाडे येथे पार पडलेल्या महाराष्ट्र राज्य वेटलिफ्टिंग युथ, ज्युनिअर व सिनीयर स्पर्धेमध्ये ज्युनिअर कॉमनवेल्थ गटात 100 किलोपेक्षा जास्त वजन उचलून उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या स्वर्गीय श्री. नाना सिंहासन यांच्या स्मरणार्थ कुमारी सौम्या सुनील दळवी हिचा विशेष सन्मान करण्यात आला.
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सौम्या दळवी हिला रोख बक्षीस 5,000 रुपये देऊन गौरविण्यात आले. हा सन्मान अक्षमेध वेटलिफ्टिंग फाउंडेशन, ठाणे यांच्या वतीने प्रदान करण्यात आला.
सदर बक्षीस वितरण सोहळा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार विजेते मधुरा सिंहासन-टोळे, महाराष्ट्र राज्य वेटलिफ्टिंग संघटनेचे अध्यक्ष सुधीर म्हाळसकर तसेच कार्यकारी सचिव प्रशांत बेंद्रे यांच्या हस्ते पार पडला.
या सन्मानामुळे कुमारी सौम्या सुनील दळवी हिच्या क्रीडा कारकिर्दीस अधिक प्रेरणा मिळाली असून तिच्या भविष्यातील वाटचालीसाठी सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


Post a Comment
0 Comments