वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज
आनंदा भालेराव
शहापूर तालुक्यातील शेई (आंबारजा) येथे आयोजित सुशिलाताई अशोकराव जाधव सभागृह शैक्षणिक तालुका वासिंद स्तर कला आणि क्रीडा महोत्सवात जिल्हा परिषद शाळा वेहलोळी (बौद्ध पाडा) या शाळेने उल्लेखनीय कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले.
या महोत्सवात शाळेच्या विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेत उत्कृष्ट सादरीकरण केले.
समूहिक लोकनाट्य स्पर्धेत शाळेने प्रथम क्रमांक पटकावला. तसेच समूहिक गीत स्पर्धेतही विद्यार्थ्यांनी दमदार सादरीकरण करत प्रथम क्रमांक मिळवला.
याशिवाय शैक्षणिक साहित्य निर्मिती स्पर्धेत शाळेचे शिक्षक श्री. संतोष जाधव सर यांनी द्वितीय क्रमांक मिळवून शाळेच्या यशात भर घातली.
या यशामागे शाळेतील शिक्षकवर्गाने घेतलेली अपार मेहनत, विद्यार्थ्यांचे सातत्यपूर्ण परिश्रम आणि मार्गदर्शन मोलाचे ठरले. शाळेने मिळवलेल्या या अभूतपूर्व यशाबद्दल वासिंद परिवाराकडून सर्व विद्यार्थी व शिक्षकवर्गावर अभिनंदनांचा वर्षाव होत असून, त्यांच्या पुढील वाटचालीस मनापासून शुभेच्छा देण्यात येत आहेत.



Post a Comment
0 Comments