वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज
शंकर गायकवाड
टाकीपठार येथील आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांसाठी बस सेवा सुरू करावी, अशी मागणी यापूर्वी शाळा प्रशासनाकडून करण्यात आली होती. मात्र सध्या सकाळी सुमारे १०.३० वाजता येणारी बस टाकी पठार या ठिकाणी येऊन आश्रम शाळेकडे न जाता थेट टाकी पठार मठाकडे वळते.
ज्या फाट्यावरून बस टाकी फाटा–मोठा मार्गे जाते, त्या ठिकाणापासून आश्रम शाळेचे अंतर सुमारे २०० मीटर आहे. या मार्गावरून आश्रम शाळेतील विद्यार्थी तसेच शाळेजवळील शासकीय दवाखाना (टाकी पठार पी.एस.सी.) येथे येणाऱ्या रुग्णांना पायी चालत जावे लागते. त्यामुळे विद्यार्थ्यांना तसेच रुग्णांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
या पार्श्वभूमीवर, बस प्रथम टाकी पठार आश्रम शाळेपर्यंत यावी व त्यानंतर टाकी पठार मठाकडे जावी, अशी ठाम मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे. ही मागणी केवळ विद्यार्थ्यांचीच नव्हे तर दवाखान्यात येणाऱ्या रुग्णांचीही आहे.
बस सेवा थेट आश्रम शाळेपर्यंत सुरू झाल्यास विद्यार्थ्यांची गैरसोय टळेल, रुग्णांनाही मोठा दिलासा मिळेल आणि परिसरातील नागरिकांसाठीही ही सुविधा उपयुक्त ठरेल. त्यामुळे संबंधित प्रशासनाने या मागणीकडे तातडीने लक्ष देऊन सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


Post a Comment
0 Comments