वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज
शंकर गायकवाड
सावरोली सो - शासनाच्या आदेशानुसार ग्रामपंचायत सावरोली सो येथे राष्ट्रीय पेसा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात आदरशांना वंदन करून करण्यात आली.
या कार्यक्रमप्रसंगी ग्रामपंचायतचे सरपंच श्री. मधुकर निरगुडा यांनी राष्ट्रीय पेसा दिनाचे महत्त्व सांगत आजच्या कार्यक्रमाची सविस्तर माहिती उपस्थितांना दिली. तसेच ग्रामपंचायतच्या ग्रामसेविका श्रीमती राऊत मॅडम यांनी पेसा कायद्याअंतर्गत ग्रामपंचायतीत कशा प्रकारे कामकाज केले जाते, याबाबत सखोल माहिती सादर केली.
कार्यक्रमास विशेष उपस्थिती म्हणून ग्रामपंचायत तंटामुक्ती अध्यक्ष तथा वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज शहापूर तालुका प्रतिनिधी श्री. शंकर गायकवाड यांनी पेसा दिनाचे महत्त्व स्पष्ट करत पेसा कायद्यांतर्गत येणाऱ्या विविध योजनांची अंमलबजावणी कशा पद्धतीने करावी, याबाबत मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाला श्री. सुखदेव निरगुडा, श्री. अशोक दवणे, श्रीमती रेणुका निरगुडा, श्री. चंदू शीद यांच्यासह ग्रामस्थ व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Post a Comment
0 Comments