वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज
प्रतिनिधी- सुरेखा चव्हाण
दिवा शहर - दिवा शहरातील सन्माननीय व ज्येष्ठ नागरिक आयु. बासु शेठ चव्हाण यांनी दि. २४ डिसेंबर २०२५ रोजी आपल्या वैवाहिक जीवनाचा ४४ वा लग्नवाढदिवस अत्यंत उत्साहात व आनंदी वातावरणात साजरा केला.
चार दशकांहून अधिक काळ टिकून राहिलेल्या या पवित्र स्नेहबंधात प्रेम, संयम, त्याग, समजूतदारपणा आणि परस्पर सन्मान यांचे दर्शन घडते. आजच्या धावपळीच्या युगात आदर्श वैवाहिक जीवन कसे असावे, याचा वस्तुपाठ देणारे आयु. बासु शेठ चव्हाण यांचे जीवन अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
घरगुती व सामाजिक जबाबदाऱ्या समर्थपणे पेलत त्यांनी आपल्या कुटुंबाला संस्कारांची शिदोरी दिली. त्यांच्या सौम्य स्वभावामुळे, स्पष्ट विचारसरणीमुळे व समाजाशी असलेल्या आपुलकीमुळे ते दिवा शहरात सर्वदूर परिचित आहेत.
या मंगलप्रसंगी कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार तसेच सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य व सुखी वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा दिल्या. सर्वत्र आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.
💐💐 ४४ वर्षांचा हा वैवाहिक प्रवास नव्या पिढीसाठी प्रेरणा ठरो, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
या खास प्रसंगी आपले प्रेम व भावना व्यक्त करताना—
शुभेच्छुक :
✍️ राहुल राठोड (जावई)
✍️ सुरेखा चव्हाण (मुलगी)
यांनी आई-वडिलांच्या आयुष्यातील हा सुवर्णमहोत्सवी क्षण कायम स्मरणात राहील, असे सांगून मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.




Post a Comment
0 Comments