वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज ✍️
प्रतिनिधी- बाळकृष्ण सोनवणे
बुधवार, दि. 03 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ७० व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त डोळखांब येथे अभिवादन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून उपस्थित मान्यवरांनी अभिवादन केले.
सालाबादप्रमाणे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) तर्फे जिल्हा परिषद शाळा डोळखांब, हेदवली, कातकरवाडी आणि उमवणेपाडा येथील विद्यार्थ्यांना वही व पेनचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमात खालील मान्यवरांची उपस्थिती लाभली :
मा. विश्वनाथ गायकवाड – अध्यक्ष, RPI डोळखांब विभाग
मा. ना. सा. जाधव गुरुजी – उपसरपंच, डोळखांब
मा. शिवाजी भाऊ देशमुख – ज्येष्ठ नेते
मा. सुरेश मुकणे – सरपंच, डोळखांब ग्रामपंचायत
मा. यशवंत घनघाव – सदस्य, ग्रामपंचायत डोळखांब
RPI ज्येष्ठ कार्यकर्ते.
मा. मतीन पठाण – युवक अध्यक्ष, डोळखांब विभाग
मा. नासीर शेख – अध्यक्ष युवा, डोळखांब शहर
मा. रामचंद्र घरत – सामाजिक कार्यकर्ते
मा. संदीप गायकवाड – अध्यक्ष, भारतीय बौद्ध महासभा डोळखांब
अनिस शेख – कार्याध्यक्ष, RPI डोळखांब
जावेद पठाण – उपाध्यक्ष, RPI डोळखांब
नरेश गायकवाड – उपाध्यक्ष, RPI डोळखांब शहर
नदीम पठाण – RPI कार्यकर्ते.
तसेच शाळेतील शिक्षकवृंद – मनिषा चौधरी मॅडम, सावंत मॅडम, गोष्टे मॅडम, जहुरे मॅडम आणि कांबळे सर यांनी कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य केले.


Post a Comment
0 Comments