वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज
कार्यकारी संपादक रितेश साबळे
राज्यात होऊ घातलेल्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये वंचित बहुजन आघाडी आणि भारतीय जनता पक्ष हेच दोन राजकीय पक्ष प्रत्येकी ५०-५० टक्के उमेदवार उभे करण्याची क्षमता ठेवतात, असा ठाम दावा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
ते पुढे म्हणाले की, “युतीसाठी आम्ही कोणालाही शोधत नाही.
काही प्रभागांमध्ये इतर राजकीय पक्षांकडे उमेदवारच उपलब्ध नाहीत. त्यामुळे गरजेपोटी तेच पक्ष आमच्याकडे युतीसाठी येत आहेत.” यावरून वंचित बहुजन आघाडीची संघटनात्मक ताकद आणि तळागाळातील विस्तार अधोरेखित होतो.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकांचा संदर्भ देत आंबेडकर म्हणाले की, “आता झालेल्या निवडणुकांमध्ये आम्ही ज्या पद्धतीने रणनीती आखली, त्याच धर्तीवर आगामी महानगरपालिका निवडणुकांमध्येही आमची वाटचाल असेल.”
युतीबाबत भूमिका स्पष्ट करताना त्यांनी सांगितले की, आगामी निवडणुकांसाठी अजित पवार, एकनाथ शिंदे, शरद पवार, काँग्रेस तसेच उबाठा (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) यांच्याशी जर आमच्या कमिटीचे जमले, तर ते स्वागतार्ह असेल. मात्र, कोणतीही युती ही सन्मान, राजकीय प्रामाणिकपणा आणि समान कार्यक्रमाच्या आधारेच होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
काँग्रेसवर टीका करताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, “ज्या ठिकाणी काँग्रेसने नीट वर्तन केले नाही, तिथे आम्ही नांदेडसारख्या ठिकाणी त्यांना उडवून लावले आहे.” यावरून आगामी काळात वंचित बहुजन आघाडी कोणत्याही पक्षाशी आंधळ्या युतीऐवजी ठाम आणि स्वतंत्र भूमिका घेणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
राज्याच्या राजकारणात आगामी महानगरपालिका निवडणुका निर्णायक ठरण्याची शक्यता आहे, श्रध्देच ॲड ' प्रकाशजी आंबेडकर साहेब यांनी बोलताना आपले मत स्पष्टपणे मांडली .


Post a Comment
0 Comments