वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज
कार्यकारी संपादक रितेश साबळे
मुंबई - मुंबईत वंचित बहुजन युवा आघाडीचा भव्य पक्षप्रवेश सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्यात शेकडो युवक, महिला व कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश करत संघटनेला बळकटी दिली.
मुंबईकरांसाठी विकास, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, हक्काचे घर तसेच मुंबईला पाण्यात तुंबण्यापासून वाचवण्यासाठी नियोजनबद्ध उपाययोजना या मुद्द्यांवर वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी मोठा जनाधार उभा राहत असल्याचे या पक्षप्रवेशातून दिसून आले.
वंचित बहुजन युवा आघाडीचे मुंबई प्रदेशाध्यक्ष सागर गवई यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला. यावेळी विविध क्षेत्रातील युवक, महिला व सामाजिक कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला.
विशेष म्हणजे, शिवसेना शिंदे गटातील काही पदाधिकारी तसेच महिला व युवकांनी मोठ्या संख्येने वंचित बहुजन युवा आघाडीत प्रवेश केल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
या कार्यक्रमास वंचित बहुजन युवा आघाडीचे मुंबई महासचिव प्रा. रोनक जाधव, उपाध्यक्ष आरिफ पठाण, समन्वयक चेतन गायकवाड, विजय लांडगे, अभिषेक वाकोडे, तसेच ज्येष्ठ कार्यकर्ते विनायक डावरे व युवा कार्यकर्ते किरण डावरे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.




Post a Comment
0 Comments