Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

*भारतीय बौद्ध महासभा शाखा ठाणे जिल्ह्याच्या वतीने मनुस्मृती दहन अर्थात स्त्रीमुक्ती दिन मोठ्या उत्साहात साजरा.....*

 

वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज

शंकर गायकवाड

भारतीय बौद्ध महासभा शाखा ठाणे जिल्हा (महिला/पुरुष) कार्यकारिणीच्या विद्यमाने *गुरुवार दि. 25 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 2:00 ते 6:00 वाजेपर्यंत मनुस्मृती दहन अर्थात स्त्रीमुक्ती दिन स्थळ : सिंधुभवन हॉल, सपना गार्डन,सपना टॉकीज जवळ उल्हासनगर-03* याठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

सदर कार्यक्रमास *प्रमुख मार्गदर्शक व उपस्थिती म्हणून पुज्य भंते आद.धम्मप्रियजी, पुज्य भंते धम्मपालजी, आद.बी.एच गायकवाड (राष्ट्रीय सचिव) आद.एस.एस.वानखडे (केंद्रीय प्रशिक्षण विभाग प्रमुख),आद.वसंत पराड (राष्ट्रीय सचिव), आद.स्वातीताई शिंदे (महाराष्ट्र महिला कमिटी अध्यक्ष) आद.रमेश वाघमारे (असिस्टंट लेफ्टनंट जनरल एस.एस.डी.) आद.विनिता ताई माने (असिस्टंट लेफ्टनंट कर्नल एस.एस.डी.)* हे होते.

 *कार्यक्रमाच्या सुरवातीस समता सैनिक दल ठाणे बटालियन याच्यावतीने 45 (महिला /पुरुष) यांच्या उपस्थितीत मानवंदना देण्यात आली व स्मृतिशेष के.पी.गायकवाड गुरुजी यांना जाहीर मूक आदरांजली वाहण्यात आली.* 


 *उपरोक्त कार्यक्रमास आद.बी.एच.गायकवाड (राष्ट्रीय सचिव) यांनी मार्गदर्शन करत असतांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन का केले यांचे उत्कृष्ट दाखले दिले तसेच आद.डॉ.एस.एस.वानखडे (केंद्रीय प्रशिक्षण विभाग प्रमुख) यांनी आपल्या मार्गदर्शनात कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जाहीर सभेत मनुस्मृती दहन दिनी पारित करण्यात आलेले 06 ठराव यावर विस्तृत माहिती दिली व ठरावाचे वाचन केले.त्याचप्रमाणे आद.वसंत पराड (राष्ट्रीय सचिव) यांनी खरी शिक्षणाची जननी माता सावित्रीमाई फुले यांनी आपल्या तत्कालीन कठीण परिस्थितीत शिक्षणाची मुहूर्तमेढ रुजवत मुलींच्या शिक्षणाकरिता दहा वर्षात एकूण 18 शाळा कशा उभ्या केल्या? याची माहिती दिली.* 

*कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आद.बापु ढोडरे (कोषाध्यक्ष),आद.डी.एन.धिवर (संस्कार उपाध्यक्ष),आद.उत्तम सोनवणे (संस्कार सचिव),आद.कांतीलाल भडांगे (संस्कार सचिव) आद.प्रशांत गांगुर्डे (कार्यालयीन सचिव),आद.आर.ई.कांबळे (प्र.व पर्यटन सचिव) आद.अभिजित जाधव (संघटक)आद.भरत घनघाव(संघटक)आद.संजय भालेराव (संघटक),आद.राहुल इंगळे (संघटक),आद.इंदुमती सुर्वे (संरक्षण सचिव) आद.विजयाताई दामोदरे( संस्कार सचिव)आद.विद्याताई उघाडे (कार्यालयीन सचिव) आणि इतर ठाणे जिल्हा (महिला/पुरुष) कार्यकारिणी सर्व पदाधिकारी तालुका व शहर पदाधिकारी यांनी अतिशय परिश्रम घेतले. कार्यक्रमास ठाणे जिल्हा अंतर्गत तालुका /शहर /ग्राम /वार्ड शाखा पदाधिकारी,केंद्रीय शिक्षक, बौद्धाचार्य, समता सैनिक दल अधिकारी व सैनिक,आजी-माजी पदाधिकारी, माजी श्रामनेर, हितचिंतक, कार्यकर्ते, बौद्ध उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आद. विजय गायकवाड (अध्यक्ष ठाणे जिल्हा) सूत्रसंचालन आद.छगन सुरवाडे (सरचिटणीस ठाणे जिल्हा) स्वागतध्यक्ष व प्रास्ताविक आद.शिलाताई तायडे (अध्यक्ष महिला ठाणे जिल्हा ) व आभारप्रदर्शन आद.प्रशांत गांगुर्डे (कार्यालयीन सचिव ठाणे जिल्हा) यांनी केले*



Post a Comment

0 Comments