वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज
शंकर गायकवाड
गांगणवाडी : दरवर्षीप्रमाणे यंदाही गांगणवाडी येथे आयोजित श्री गणेश चषक क्रिकेट स्पर्धा 2025-26 या प्रतिष्ठित स्पर्धेच्या तिसऱ्या वर्षाचे उद्घाटन शुक्रवार, दि. 12 डिसेंबर 2025 रोजी उत्साहात संपन्न झाले.
या विशेष सोहळ्याचे उद्घाटन गांगणवाडी शाळेचे मुख्याध्यापक कंकुशे गुरुजी, तसेच ग्रुप ग्रामपंचायत सावरोली सो तंटामुक्ती अध्यक्ष व वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज शहापूर तालुका प्रतिनिधी शंकर गायकवाड,
माजी पाणीपुरवठा अध्यक्ष जगन दवणे,सह शिक्षक हरड गुरुजी,गांगणवाडीतील मान्यवर ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
या निमित्ताने परिसरातील अनेक संघ उत्साहाने सहभागी झाले असून मैदानावर चुरसपूर्ण सामने पाहायला मिळणार आहेत. तरुणाईत क्रीडाविकास आणि संघभावनेला चालना देण्यासाठी अशा स्पर्धा महत्वाची भूमिका बजावत असल्याचे उद्घाटकांनी सांगितले.
स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच वातावरणात क्रीडा उत्साहाची चुणूक जाणवत असून पुढील सामन्यांना प्रेक्षकांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभण्याची शक्यता आहे.



Post a Comment
0 Comments