वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज ✍️
शंकर गायकवाड
खरीवली — आज दिनांक ९ डिसेंबर २०२५ रोजी खरीवली येथे आयोजित करण्यात आलेल्या केंद्रस्तरीय विविध गुणदर्शन स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सावरोली सो. शाळेच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करत शाळेचा नावलौकिक वाढविला.
या स्पर्धेत शाळेच्या विद्यार्थ्यांनी आपल्या कला-गुणांचा उत्कृष्ट आविष्कार सादर करत विविध पारितोषिकांवर आपले नाव कोरले.
समूह गायन (लहान गट) प्रकारात विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक, तर समूह गायन (मोठा गट) प्रकारातही प्रथम क्रमांक पटकावला. यासोबतच समूह नृत्य या प्रकारात विद्यार्थ्यांनी द्वितीय क्रमांक मिळवून उल्लेखनीय कामगिरी केली.
या यशामागे विद्यार्थ्यांची मेहनत, शिक्षकांचे मार्गदर्शन तसेच शाळा व्यवस्थापनाचे मोलाचे सहकार्य कारणीभूत ठरले आहे. या यशाबद्दल सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे तसेच मार्गदर्शक शिक्षकांचे हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे. शाळेच्या या उज्ज्वल यशामुळे परिसरातून कौतुकाचा वर्षाव होत असून भविष्यातही अशाच प्रकारे विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करावे, अशा शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.



Post a Comment
0 Comments