Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

शहापूर येथे जगद्गुरु स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या पादुका दर्शन सोहळ्याचे भक्तिभावात आयोजन



 वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज

शहापूर तालुका प्रतिनिधी-शंकर गायकवाड

आज शहापूर येथील गोठेघर परिसरातील साई भगवान लॉन्स येथे नाणीज धाम दक्षिण पीठाचे जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या पादुका दर्शन सोहळ्याचे भक्तिभावपूर्ण वातावरणात आयोजन करण्यात आले होते. या पवित्र सोहळ्यास मा. आमदार पांडुरंगजी बरोरा साहेब यांनी उपस्थित राहून मनोभावे पादुकांचे दर्शन घेतले.

यावेळी उपस्थितांना संबोधित करताना आमदार बरोरा म्हणाले की, “आपण केलेली प्रत्येक सेवा गुरूंच्या चरणी अर्पण करतो. मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे, असे जगद्गुरूंनी नेहमीच सांगितले आहे.” त्यांच्या या भावनिक उद्गारांना उपस्थित भाविकांकडून दाद मिळाली.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज ट्रस्ट यांच्या वतीने ठाणे जिल्ह्यातील गोरगरीब व गरजू शेतकऱ्यांना मोफत औषध फवारणी पंपांचे वितरण करण्यात आले. या उपक्रमामुळे शेतकरी वर्गात समाधान व्यक्त करण्यात आले.

या प्रसंगी शिवाजी अधिकारी, विलास गगे, जयराम वारघडे यांच्यासह स्वामींचे सेवेकरी अनंता अधिकारी, दौलत शिरोसे, भाऊ शिरोसे, अनंता रसाळ, रघुनाथ सोनारे तसेच मोठ्या संख्येने भाविक भक्तगण उपस्थित होते. कार्यक्रम शांततामय व भक्तिमय वातावरणात पार पडला.



Post a Comment

0 Comments