वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज
शंकर गायकवाड
शहापूर शहरातील अनेक ठिकाणी मागील अनेक दिवसांपासून रोड लाईट बंद अवस्थेत होत्या. याबाबत शहापूर नगरपंचायतीकडे वेळोवेळी अर्ज तसेच तोंडी सूचना देऊन संबंधित रोड लाईट सुरू करण्याची मागणी करण्यात आली होती.
या समस्येची दखल घेत रूपेश कोंडे साहेब यांनी तत्काळ कार्यवाही करत विजय बांधेकर यांना बंद पडलेल्या रोड लाईट काढून त्या ठिकाणी नवीन रोड लाईट बसवण्याचे निर्देश दिले. त्यानुसार आज संबंधित ठिकाणी काम पूर्ण करण्यात आले असून प्रत्यक्ष जाऊन ते काम पूर्ण झाल्याचे दाखविण्यात आले.
शहरातील नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने करण्यात आलेल्या या तातडीच्या उपाययोजनेबद्दल शहापूर नगरपंचायत व रूपेश कोंडे साहेब यांचे नागरिकांकडून आभार व्यक्त करण्यात येत आहेत. अशाच प्रकारे नागरिकांच्या समस्यांकडे संवेदनशीलतेने पाहून त्वरित उपाययोजना करण्यात याव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.


Post a Comment
0 Comments