Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

लहान मुलांनी गाजवली मिनी मॅरेथॉन स्पर्धा

 


वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज 

शंकर गायकवाड

भातसानगर, खेळ कुठलाही असो, त्यामध्ये हिरीरीने सहभाग घेणारे खेळाडूच त्या स्पर्धेला वेगळी उंची देतात. असाच उत्साह शहापूरकरांनी अनुभवला तो शहापूर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना शाखेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मिनी मॅरेथॉन स्पर्धेत. या स्पर्धेत सुमारे दीड हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेत, परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण केले.


आज सकाळी सात वाजता या मिनी मॅरेथॉनला सुरुवात झाली. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून विश्वास थळे, कुंदन पाटील, तालुकाप्रमुख कुलदीप धानके, योगेश निमसे, रश्मी निमसे, गुलाब भेरे, काशिनाथ तिवरे, रविंद्र लकडे, अजित पोद्दार, स्वानंद शेलावले आदी मान्यवर उपस्थित होते.


या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी शहापूर पोलीस प्रशासन, आरोग्य विभाग, नगरपंचायत कर्मचारी, क्रीडाशिक्षक तसेच सामाजिक व सांस्कृतिक मंडळांनी मोलाचे सहकार्य केले. शिवसेना शहापूर शाखेचे शहराध्यक्ष विजय देशमुख यांच्या प्रयत्नातून हे आयोजन साकार झाले, हे विशेष.



स्पर्धेचे निकाल पुढीलप्रमाणे :

लहान गट – मुले :

प्रथम – साई विशे (सार्थक इंग्लिश मीडियम स्कूल)

द्वितीय – निशांत वेखंडे (म. ना. बोराळा)

तृतीय – रुद्र घरत (म. ना. बोराळा)

उत्तेजनार्थ – समाधान सदगीर (म. ना. बोराळा), तन्मय कनोजा (सार्थक इंग्लिश मीडियम स्कूल)


लहान गट – मुली :

प्रथम – साक्षी ढोन्नर (म. ना. बोराळा)

द्वितीय – पल्लवी ढोन्नर (म. ना. बोराळा)

तृतीय – रोहिणी जाधव (दमानी स्कूल)

उत्तेजनार्थ – ईश्वरी चंदगीर (म. ना. बोराळा), अर्चना शर्मा (ग. वि. खाडे)


इयत्ता आठवी ते दहावी – मुले :

प्रथम – अविष्कार (म. ना. बोराळा)

द्वितीय – जय लोखंडे (म. ना. बोराळा)

तृतीय – ऋग्वेद विशे (सार्थक इंग्लिश मीडियम स्कूल)


इयत्ता आठवी ते दहावी – मुली :

श्रावणी सोनार, अबोली शिंदे (ग. वि. खाडे), उज्वला दिवेकर, रीना मुकणे (आनंदी दिघे), मिताली यादव (ग. वि. खाडे)


मोठा गट – मुले :

आशिष भगरे, विक्रम भवर, विजय वीर (सोनूभाऊ बसवंत महाविद्यालय), कौस्तुभ बोंद्रे (आय. टी. आय.), अविनाश शिंदे (एस. बी.)


मोठा गट – मुली :

भाग्यश्री विदे, काजल पानेरा (खाडे विद्यालय), अर्चना महाले, श्रद्धा माळी, रूपाली सातपुते (खाडे विद्यालय)


या मिनी मॅरेथॉन स्पर्धेत शहापूरमधील १७ शाळांनी सहभाग नोंदवला असून सुमारे दीड हजार विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष धाव घेत ही स्पर्धा उत्साहात यशस्वी केली.

Post a Comment

0 Comments