वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज
कार्यकारी संपादक : रितेश साबळे
वंचित बहुजन आघाडीला महाराष्ट्रात मिळालेले अभूतपूर्व यश, वंचित समाजाची सत्तेकडे सुरू असलेली ठाम वाटचाल तसेच उमेदवार मुलाखतींसाठी उसळलेली प्रचंड गर्दी ही सर्व बाबी बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडीच्या स्पष्ट ध्येय-धोरणांमुळे शक्य झाल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
वंचित बहुजन आघाडीच्या सामाजिकरणाच्या राजकारणाने प्रभावित होऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतील (मनसे) अनेक पदाधिकाऱ्यांनी वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य अरुंधतीताई शिरसाठ यांच्या हस्ते वंचित बहुजन युवा आघाडीत जाहीर प्रवेश केला.
हा पक्षप्रवेश सोहळा वंचित बहुजन युवा आघाडी मध्य शहराध्यक्ष संदीप जाधव यांच्या नेतृत्वाखाली पार पडला. या वेळी मनसेचे शहर संघटक अमोल विधाते, उपविभाग अध्यक्ष नवनाथ हटकर, प्रथमेश घाटबाळे, करण विधाते, विशाल येडकर, प्रशांत राजपूत, प्रेम पोटफोडे, सुनील भिसे, सचिन महापुरे, विशाल राजपूत यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला.
या प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे औरंगाबाद पूर्व जिल्हाध्यक्ष ॲड. रामेश्वर तायडे, औरंगाबाद पश्चिम जिल्हाध्यक्ष रुपचंद गाडेकर, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष कोमल हिवाळे, युवा आघाडी जिल्हा महासचिव सतीश शिंदे, युवा आघाडी पूर्व शहराध्यक्ष अफसर पठाण यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Post a Comment
0 Comments