वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज
कार्यकारी संपादक रितेश साबळे
शेगाव | दि. १५ डिसेंबर २०२५ : शेगाव येथून अकोला या दिशेकडे एसटी बस सेवा सुरू करण्यात यावी, अशी मागणी करत शेगाव बस स्थानकातील आगार प्रमुखांना निवेदन देण्यात आले. शेगाव परिसरातील अनेक शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दररोज अकोला येथे ये-जा करावी लागत असून, थेट बस सेवा नसल्यामुळे त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
या पार्श्वभूमीवर शेगाव–लोहारा–निंबा फाटा–अकोला या मार्गावर नियमित व सुरळीत बस सेवा सुरू करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. या बस सेवेमुळे विद्यार्थ्यांसह सामान्य नागरिक, कामगार व व्यापाऱ्यांनाही मोठा दिलासा मिळणार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
निवेदनावर पुढील मान्यवरांच्या सह्या आहेत :
प्रवीण प्रल्हाद मोरे, सरपंच, लोहारा
शरद श्रीकृष्ण बकाल, पोलीस पाटील, लोहारा
राहुल बाळकृष्ण बकाल, रा. लोहारा
मुज्जित शहा महबूब शहा, रा. लोहारा
करण अण्णा गोडवे, रा. निंबा फाटा
अनिकेत बाळकृष्ण चांदणे, रा. निंबी
तुकाराम रामकृष्ण गायकवाड, रा. अदुरा
तसेच १५ डिसेंबर २०२५ रोजी शेगाव बस स्थानक आगार प्रमुखांकडे निवेदन देताना अनिकेत बाळकृष्ण चांदणे व राजेश सुरेश राज वैद्य उपस्थित होते.
या मागणीची दखल घेऊन संबंधित मार्गावर लवकरात लवकर बस सेवा सुरू करण्यात यावी, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.


Post a Comment
0 Comments