वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज ✍️
शहापूर : धम्मदीप बुद्धिस्ट कल्चरल संस्था, शहापूर यांच्या वतीने भारतीय संविधान गौरव दिन मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात सांस्कृतिक भवनात पार पडला. या सोहळ्यात धम्मदीप दिनदर्शिका प्रकाशन तसेच कायदेविषयक सल्ला केंद्राचे उद्घाटन करण्यात येणे ही या कार्यक्रमाची विशेष आकर्षणे ठरली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ऍड. अविनाश महादेव थोरात होते. प्रख्यात लेखक, संपादक व प्रबोधक मा. संजय आवटे यांनी आपल्या प्रेरणादायी भाषणातून सांगितले की—
“संविधान गौरव दिन हा भारतीय नागरिकांच्या अभिमानाचा दिवस आहे. संविधानातील मूल्यांचे पालन केल्यास समाजात समता, बंधुता आणि न्यायाची खरी स्थापना होईल.”
कार्यक्रमाचे प्रस्ताविक डॉ. मिलिंद चन्ने, तर प्रभावी सूत्रसंचालन सरचिटणीस हरिलाल उबाळे यांनी केले.
सन 2005 पासून संस्था संविधान गौरव दिन सातत्याने साजरा करत असून संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. ए. डी. घायवट (सेवानिवृत्त मुख्याध्यापक) यांनी नऊ वर्ष अध्यक्षपद भूषवत शहापूरमध्ये संस्थेची भक्कम उभारणी केली आहे.
संस्थेने 28 गुंठे जागा खरेदी करून त्यावर यूपीएससी–एमपीएससी विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका, भव्य सांस्कृतिक केंद्र, महिला बचत गट मार्गदर्शन केंद्र, पाली भाषा केंद्र तसेच बुद्ध विहार उभारून बुद्ध रूपाची स्थापना केली—जो संस्थेच्या सामाजिक कार्याचा भक्कम पुरावा आहे.
या उभारणीत मा. महेंद्र उबाळे, मा. महेश सागर, मा. सुरेश थोरात तसेच इतर अनेक दानशूर व्यक्तींनी मोलाचे योगदान दिले आहे.
कार्यक्रमास ज्येष्ठ विचारवंत मा. सुरेशजी सावंत, सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी मा. बी. डी. जाधव, ऍड. सेवक उमवणे (अध्यक्ष—शहापूर वकील संघटना), मा. गरुड साहेब, महिला ब्रिगेडियर गायकवाड ताई, बहुजन समाजातील अनेक मान्यवर तसेच वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूजचे प्रतिनिधी शंकर गायकवाड, बाळकृष्ण सोनवणे आणि इतर पत्रकार बांधवांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माजी अध्यक्ष अशोक दूधसागरे, दिलीप वाघचौरे, अशोक गायकवाड, प्रकाश पवार, दिलीप ओंकारेश्वर, सुनील उबाळे, मधुकर उबाळे, जनार्दन उबाळे, उत्तम गायकवाड, रमेश शेवाळे, विजय भोईर,महादेव भोईर, सुधीर जावळे तसेच धम्मदीप संस्थेतील सर्व सभासदांचे विशेष योगदान लाभले.
अध्यक्षीय मनोगतात अॅड. थोरात यांनी भारतीयांना संविधानातील मूल्यांचे जतन करण्याचे आवाहन करताना धम्मदीप संस्थेच्या कार्यास अधिकाधिक सहकार्य करण्याची विनंती केली. कार्यक्रमानंतर सर्व उपस्थितांसाठी भोजनाची उत्तम आणि सुयोजित व्यवस्था करण्यात आली होती.






Post a Comment
0 Comments