![]() |
🟦 राज्याचे नवनियुक्त मुख्य सचिव मा. श्री.राजेश अग्रवाल यांचे संघटनेचे वतीने स्वागत. |
वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज ✍️
मुंबई ( प्रतिनिधी ) अनु. जाती./ जमाती / वि. जा. भ. ज./ ई. मा. व./ वि. मा. प्र. शासकीय अधिकारी -कर्मचारी संघटना मंत्रालय मुंबई संघटनेचे अध्यक्ष तथा कामगार नेते भारत वानखेडे यांचे नेतृत्वात संघटनेचे शिष्ट मंडळाने महाराष्ट्र राज्याचे नवनियुक्त मुख्य सचिव मा. श्री.राजेश अग्रवाल यांची दिनांक 1 डिसेंबर रोजी मंत्रालयात भेट घेऊन त्यांचे स्वागत केले व महाराष्ट्रातील अधिकारी - कर्मचारी यांचे न्याय हक्काबाबत निवेदन दिले.
यावेळी महाराष्ट्र राज्याचे नवनियुक्त मुख्य सचिव मा. श्री.राजेश अग्रवाल यांचे सोबत कामगार नेते तथा संघटनेचे अध्यक्ष भारत वानखेडे यांनीराज्यातील अधिकारी/ कर्मचाऱ्यांची प्रलंबित मागण्या बाबत चर्चा करणेत येऊन निवेदन देऊन बैठकीची वेळ मिळणे बाबत विनंती केली.
![]() |
| 🟦 अधिकारी - कर्मचारी यांचे न्याय हक्का बाबत दिले निवेदन. |
त्यानंतर डॉ. बी. आर. आंबेडकर लाईफ अँड मिशन हे ग्रंथ भेट स्वागत करण्यात आले.तसेच संघटनेचे वतीने सेवापूर्ती निमित्त राज्याचे तत्कालिन मुख्य सचिव मा राजेश कुमार यांचेही स्वागत करणेत येऊन सत्कार करणेत आला.यावेळी शिष्टमंडळात
संघटनेचे श्री. अंबादास चंदनशिवे कार्याध्यक्ष तथा उपसचिव, .श्री. संतोष कराड उपसचिव, . श्री.भास्कर बनसोडे उपाध्यक्ष तथा अवर सचिव, श्री.किरण शार्दुल कक्ष अधिकारी , श्री.सचिन कांबळे कक्ष अधिकारी, श्री.ज्ञानेश्वर पाठमशे संघटक सचिव, श्रीमती सुरेखा बोडके, श्रीमती शोभना चंदनशिवे,श्रीमती अपर्णा जाधव,श्री.प्रशांत कानगुडे, इत्यादी पदाधिकारी संघटनेचे सदस्य उपस्थित होते.



Post a Comment
0 Comments