Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

श्वान पथकातील ‘हॅप्पी’ सेवामुक्त; नवीन शोधक श्वान ‘शौर्य’ पथकात दाखल

 


वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज✍️

कार्यकारी संपादक : रितेश साबळे

जळगाव : जळगाव पोलीस दलातील श्वान पथकातील विश्वासू आणि कुशल शोधक श्वान हॅप्पी याला आज सेवामुक्त करण्यात आले. त्याच दिवशी पथकात नवीन बेल्जिअम मेलिनॉइस जातीचा प्रशिक्षित शोधक श्वान शौर्य दाखल झाला.


गुन्हे शोध आणि शोधमोहीम कामात अत्यंत सक्षम असलेला शौर्य हा ६५ हजार रुपये किंमतीत खरेदी करण्यात आला असून त्याच्या आगमनाने पथकाची कार्यक्षमता आणखी वाढणार असल्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.


सेवानिवृत्ती आणि नव्या श्वानाच्या स्वागताचा संयुक्त कार्यक्रम पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्या उपस्थितीत पार पडला. या वेळी अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपअधीक्षक (गृह) अरुण आव्हाड, राखीव पोलीस निरीक्षक सुगरवार, श्वान पथक व BDDS प्रभारी देविदास वाघ, तसेच पथकातील संदीप परदेशी, मनोज पाटील, निलेश झोपे आणि प्रशांत कंकरे उपस्थित होते.


हॅप्पीची कामगिरी उल्लेखनीय

हॅप्पीचा जन्म ५ जून २०१५ रोजी झाला. त्याने पुणे येथील सीआयडी केंद्रात ९ महिन्यांचे विशेष प्रशिक्षण पूर्ण करून १ ऑगस्ट २०१५ पासून जळगाव जिल्हा पोलीस दलात सेवा सुरू केली.


आपल्या सेवाकाळात हॅप्पीने अनेक गंभीर गुन्हे उघडकीस आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. मुक्ताईनगर, रामानंद, यावल आणि सावदा पोलीस ठाण्यांच्या गुन्ह्यांमध्ये आरोपींचा माग काढण्यात हॅप्पीने विशेष योगदान दिले.


राष्ट्रीय स्तरावरही कामगिरी

२०१८ मध्ये लखनौ येथे झालेल्या अखिल भारतीय कर्तव्य मेळाव्यात हॅप्पीने ५ वे स्थान पटकावले आणि महाराष्ट्र पोलिसांना चॅम्पियनशिप मिळवून देण्यात मोलाची मदत केली.

त्याच्या उत्कृष्ट सेवाबद्दल त्याला व त्याच्यासोबत कार्यरत पोलीस अंमलदार संदीप परदेशी आणि मनोज पाटील यांना पोलिस महासंचालकांनी प्रत्येकी १० हजारांचे पारितोषिक प्रदान केले.


सेवानिवृत्तीच्या प्रसंगी जळगाव जिल्हा पोलीस दलाने हॅप्पीच्या अविस्मरणीय सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करत मानाचा मुजरा केला.



Post a Comment

0 Comments